फिनलंडची शिक्षणपद्धती - प्रशिक्षण - कार्यशाळा

फिनलंड या देशाची शिक्षणपद्धती जगात सर्वोत्कृष्ट समजली जाते. या पद्धतीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेरंब कुलकर्णी आणि डॉ. शिरीन कुलकर्णी सध्या भारतात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई एक कार्यशाळा आयोजित करत आहे. या दोन्ही तज्ज्ञांचा परिचय आणि कार्यक्रमाचा तपशील सोबत जोडला आहे.
कार्यशाळेचा विषय: फिनलंडची शिक्षणपद्धती
दिनांक: (रविवार) ७जुलै, २०१९
वेळ: सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००
स्थळ: गांधी भवन, कोथरूड, पुणे ४११०३८ 
कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्थाचालक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षणप्रेमी यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

 

फॉर्म भरून पाठवण्याची मुदत:

दिनांक ५जुलै २०१९पर्यंत किंवा प्रवेशक्षमता पूर्ण होइपर्यंत, त्यामुळे ५ जुलैची वाट न पाहता त्वरीत फॉर्म भरून पाठवा.

नोंदणी शुल्क : नाही. (मात्र या विषयात रस आहे, हे दाखवण्यासाठी १००रुपये एवढी नाममात्र रक्कम कार्यक्रमासाठी आल्यानंतर प्रतिनिधींकडून आकारण्यात येईल.)
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
०९.३० १०.००चहापान
१०.०० १.००भोजनपूर्व सत्र
१.०० २.००भोजन
२.०० ५.००भोजनोत्तर सत्र


कार्यशाळेत फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचे पुढील मुद्दे हाताळण्यात येतील:-
*
ऐतिहासिक अंगांनी आढावा
*
धोरणकर्त्यांची भूमिका
*
शिक्षकांचे प्रशिक्षण
*
मूल्यमापन - महत्त्व आणि   पद्धती 
*
फिनलंडकडून भारताला काय शिकता येईल?

कार्यशाळेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर होईल.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft