शिक्षण विकास मंच’आयोजित राज्यस्तरीय परिषद


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्ममाने “शालेय शिक्षण : आज आणि उद्या” या विषयावरती राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवारी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत ‘रंगस्वर’, चौथा मजला, मंत्रालयासमोर,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होईल.

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री, राज्यात कृषी आणि औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, तळागाळातल्या लोकांना पंचायत राजच्या माध्यमातून लोकशाही ताकदीचे देणारे मा. यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्युनंतर त्यांचे कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी दिनांक २५ सप्टेंबर १९८५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली.

 

शेती, सहकार, महिला बचत गट आणि महिलांसाठीचे कार्यक्रम, युवकांसाठीचे कार्यक्रम, अपंगांसाठीचे कार्यक्रम आणि कायदेविषयक सल्ला अशा सामाजिक विकासाच्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान काम करत आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या शिक्षण विकास मंचाची स्थापना २००८ मध्ये डॉ. कुमुद बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांचे २०१२ मध्ये अकाली निधन झाले.
प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे शिक्षण विकास मंचच्या निमंत्रक असून डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजक, बसंती रॉय विशेष सल्लागार आणि माधव सूर्यवंशी समन्वयक म्हणून जबाबदारी पाहतात. शिक्षण विकास मंच शैक्षणिक विषयांवर परिषदा, चर्चासत्रे, शिक्षणकट्टे, व्हाट्सअॅप समूह, शिक्षक साहित्य संमेलने, दत्तक शाळा योजना, उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथांना पुरस्कार, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.

“शालेय शिक्षण: आज आणि उद्या” हा या वर्षीच्या परिषदेचा विषय आहे. शिक्षण व्यवस्था समाजाच्या गरजा पूर्ण करत असते, तर शिक्षण व्यवस्थेत समाजाच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित झालेल्या असतात. तंत्रज्ञान, आर्थिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत वेगाने बदल होत आहेत. शिक्षणात या बदलांचे प्रतिबिंब पडणे अपरिहार्यच असते. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्ययन-अध्यापन पद्धती, प्रशासन, भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्य, पालकांची भूमिका अशा सर्वच क्षेत्रांत त्या अनुषंगाने बदल होत असतात. या बदलांचा ऊहापोह करणे या परिषदेचे मुख्य प्रयोजन आहे. सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म वर नोंदणी करावी. गुगल फॉर्म- https://goo.gl/baHVoj अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी - ९९६७५४६४९८

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft