शिक्षण 'मोफत' आणि 'गुणवत्ता'पूर्णही हवे-शिक्षणकट्टयावरील सूर..

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आयोजित "शिक्षणकट्टा" या उपक्रमात "सक्तीचे मोफत शिक्षण खरेच 'मोफत' आहे का.? या विषयावर चर्चा नूकतीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये चर्चा झाली.

या चर्चेची सुरूवात जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंतराव काळपांडे यांच्या सक्तीच्या मोफत शिक्षण कायद्याच्या सादरीकरणाने झाली.

उपस्थित असलेल्या सदस्यांनी शाळा कशा पद्धतीने चालवायच्या.? वेतनेतर अनुदान बंद झाल्याने खर्च कसा भागवायचा असा प्रश्न उपस्थित केला.भरमसाठ फिस देऊनही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही.शासनाचे या संदर्भातील धोरण धरसोड वृत्तीचे आहे. याचा फटका शाळाना बसत आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.

संमिश्र समाजव्यवस्था असलेल्या या देशात शिक्षणातही अशीच व्यवस्था आढळून येते मात्र मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे असे प्रतिपादन कट्टयाच्या संयोजिका बसंती रॉय यांनी केले. उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापक, पत्रकार यांचे आभार मानून वार्षिक शिक्षण परिषदेची माहिती शिक्षण विकास मंचचे समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी दिली.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft