सक्तीचे, मोफत शिक्षण खरंच मोफत आहे काय..?



शिक्षणप्रेमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षणकट्टा. या कट्ट्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ , मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा गेली सहा वर्षे शिक्षण क्षेत्रातल्या विविध विषयांवर चर्चा करत आहे. शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई मंत्रालय समोर, नरीमन पॉईंट, येथे शिक्षण कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

शिक्षण कट्ट्यावरील विषय

सक्तीचे, मोफत शिक्षण खरंच किती मोफत आहे काय..?
भारतीय संविधानाच्या ४५ व्या कलमानुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत
आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. तसेच ८६ व्या घटनादुरुस्तीनुसार २१ अ कलमान्वये हा बालकांचा मुलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे. एप्रिल २०१० पासून शिक्षण हक्क कायदा अंमलात आला आहे.
या संदर्भात
- प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ?
- शासन अनुदानित शाळांतून नि:शु्ल्क / पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते का ? अतिथी शिक्षक(चित्रकला,पी.टी.,संगणक तत्सम विषयासाठी) यांचेवरील खर्च शाळा कसा भागवतात ?
-विद्यार्थ्यांकडून कोणकोणते शुल्क आकारण्यात येते.
- शाळा प्रवेशासाठी देणगी/ मुदत ठेवी स्वीकारल्या जातात का?
या अनुषंगाने शाळा,शिक्षक,विद्यार्थी व पालक यांना येणाऱ्या अडचणी व गुणवत्तेवर होणारा परिणाम याबाबत सविस्तरपणे चर्चा होईल. तसेच उपाययोजनेबाबतही सूचनांचा विचार होईल.
‘शिक्षण विकास मंच’ चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यावरील चर्चेत सहभागी व्हावे ही अशी आग्रहपूर्वक विनंती बसंती रॉय, संयोजक शिक्षणकट्टा, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – माधव सूर्यवंशी (समन्वयक-९९६७५४६४९८)

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft