आवाहन...

दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचामार्फत 'शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये याच विषयावर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा आमचा विचार आहे. तरी इच्छुकांनी या पुस्तकासाठी आपले लेख पाठवावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
१. लेख मुलांचे वाचन या क्षेत्रात झालेले अभ्यास/संशोधन, स्वतःचे अनुभव, या क्षेत्रात स्वतः केलेले किंवा निरीक्षण केलेले प्रयोग यांवर आधारित असावेत.
२. शब्दमर्यादा :- कमाल १२००
३. लेख मराठीत, देवनागरी लिपीत (युनिकोड आणि/किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये) असावेत. आवश्यक तेथे लेखासोबत फोटो जोडण्यात यावेत.
४. लेख दिनांक ३१ जानेवारी २०२० पर्यंत This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ई-मेल आयडीवर पाठवावे.
५. लेखाखाली लेखकाचे नाव, पत्ता आणि तीन ते चार वाक्यांत संक्षिप्त परिचय द्यावा.
६. लेख स्वीकारण्याचे, नाकारण्याचे, स्वीकारलेल्या लेखांत योग्य ते संपादकीय संस्कार करून बदल करण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे असतील.


डॉ. वसंत काळपांडे
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई

शालेय शिक्षणात वाचन संस्कृती वाढावी...

WhatsApp Image 2019 11 24 at 7.06.39 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, शिक्षण विकास मंच आयोजित १० वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आज मुंबई येथे शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती या विषयावर वर संपन्न झाली.
शिक्षण विकास मंच च्या एकूण कामाचा आढावा मुख्य सल्लागार मा. बसंती रॉय यांनी घेतला. जेष्ठ शिक्षणतज्ञ आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे प्रास्ताविक मांडून हा विषय घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ग्रंथालीचे संस्थापक मा. दिनकर गांगल यांनी परिषदेच्या विषयावर अनुभवात्मक बीजभाषण केले. वाचन संस्कृती का व कशी वाढेल? याचेही विवेचन केले. बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी लहान मुलांचे वाचन यावर उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला. यानंतर मुलांमध्ये वाचनाची आवड कशी वाढवावी..?’ या विषयावरील परिसंवादामुळे भरपूर काही शिकायला मिळालं. या परिसंवादात बालभारती किशोरचे संपादक सन्माननीय किरण केंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार, गीतांजली देगावकर, अरविंद शिंगाडे आणि वयमच्या संपादिका शुभदा चौकर आदीच्या अनुभवसंपन्न चर्चेमुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी होऊ, यासंदर्भातील समाधान निर्माण झाले.

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft