महाराष्ट्राची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांच्या कौशल्यामुळे झाली – प्रा राजेंद्र दास

यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेहमीच भारत सेवक महाराष्ट्र म्हणून मानले स्व प्र के अत्रे ,ऐस एम जोशी ,शाहीर अमर शेख यांनी संघर्ष उभा केला आणि १०५ हुतातम्यांच्या बलिदाना नंतर देखील राज्याची निर्मिती अवघड झाली होती तेव्हा चव्हाण साहेब सुधा अस्वस्थ झाले होते हा जनक्षोभ दिल्लीकरांना समजला पाहिजे म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी बोलवले महाराष्ट्राच्या निर्मितीचा तो जनक्षोभ आणि तीव्र भावना पाहून पंडीत नेहरूंनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीला १ मे १९६० रोजी मान्यता दिली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची निर्मिती आणि समकालीन समस्या या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा राजेंद्र दास यांनी आपले विचार मांडले

यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न, समृध आणि अत्यंत कल्पकतेने उभा केला यासाठी सहकार, शेती आणि उधोग हे तीनही क्षेत्र अव्वलस्थानी राहील यासाठी विशेष काळजी घेतली आणि हे तीनही क्षेत्र समृध होण्यासाठी शिक्षण क्षेत्र देखील समृध झाले पाहिजे म्हणून सिक्षण समाजातील सर्व घटकांना मिळले पाहिजे म्हणून विशेष काळजी घेतली एवठ्या विशाल विचारांचे चव्हाण साहेब होते हे करत असताना राजकारणात त्यांनी मानापमाना पेक्षाही राज्याचे सार्वजनिक हित म्हत्वाचे मानले म्हणुनच राज्य मराठ्यांचे कि मराठीचे असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा हे राज्य बहुजनांचे असे उत्तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिले म्हणुनच आजही राज्याच्या आणि देशाच्या गर्भकाळात यशवंतराव चव्हाण विचार जिवंत आहेत

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार युनुसभाई शेख होते स्वागत व प्रस्तविक विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड यांनी केले जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी विभागीय केंद्राचे सदस्य माजी खासदार धर्मणा सादूल यांची प्रमुख उपस्थिती होती निर्मलकुमार फडकुले सभागृहात सपन्न झालेल्या या कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते

माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नाकडे लक्ष द्यावे - पद्मभूषण देशपांडेसोलापूर - सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात 'समाजाचे प्रश्न आणि प्रसार माध्यमे' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, दत्ता गायकवाड, संचालक डॉ. इ. एन. अशोककुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आजचे युग हे वेगवान युग आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये. बदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली आहे. यापुढच्या काळात टेलिव्हिजनचे युग संपून मोबाईलचे युग व्यापक होईल, त्यादृष्टीने भावी पत्रकारांनी तंत्रज्ञान कौशल्य मिळवायला हवे असे ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी सांगितले.

एकेकाळी संगणक लोकांना बेरोजगार करील या भीतीतून समाजाच्या उव्‍च स्तरातून नवतंत्रज्ञानाला विरोध झाला. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले व संगणकाचा देशात प्रसार होण्यास उशीर झाला. यापुढे नवतंज्ञानाला विरोध केला जाऊ नये. सजगपणे नवतंत्रज्ञान स्वीकारावे. कालबाहय झालेले अभ्यासक्रम, पध्दती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी दत्ता बाळसराफ यांनी सांगितले.

जुने ते सर्व वाईट असे मानणे चूक ठरेल. तत्वज्ञानासारख्या अनेक महत्वाच्या विषयांची आजही तेवढीच गरज्‍ आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोककुमार म्हणाले की, माध्यमे बदलत असताना , त्यांनी जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेपासून दूर जाता कामा नये असे मत दत्ता गायकवाड यांनी मांडले.

कार्यकमाचे सूत्रसंचालन जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले. सदर कार्यक्रमास नवं महाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक निलेश राऊत, यशवंतराव चव्हान प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, विजय काणेकर, डॉ. माया पाटील, प्रा अंबादास भासके, प्रा मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे आणि विद्यार्थी इत्यादींची उपस्थिती होती.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

 मा. श्री. गो. मा. पवार
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, सोलापूर
 श्री. दिनेश शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft