माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नाकडे लक्ष द्यावे - पद्मभूषण देशपांडेसोलापूर - सध्याच्या काळात प्रसारमाध्यमे भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देत आहेत, त्याऐवजी माध्यमांनी जनतेच्या ख-या प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात 'समाजाचे प्रश्न आणि प्रसार माध्यमे' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, दत्ता गायकवाड, संचालक डॉ. इ. एन. अशोककुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आजचे युग हे वेगवान युग आणि तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मात्र तंत्राच्या आहारी जाऊन आशय मागे पडू नये. बदलत्या समाजाप्रमाणे माध्यमांमध्येही बदल होत गेले. त्यामुळे बातम्यांची भाषाही बदलली आहे. यापुढच्या काळात टेलिव्हिजनचे युग संपून मोबाईलचे युग व्यापक होईल, त्यादृष्टीने भावी पत्रकारांनी तंत्रज्ञान कौशल्य मिळवायला हवे असे ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी सांगितले.

एकेकाळी संगणक लोकांना बेरोजगार करील या भीतीतून समाजाच्या उव्‍च स्तरातून नवतंत्रज्ञानाला विरोध झाला. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले व संगणकाचा देशात प्रसार होण्यास उशीर झाला. यापुढे नवतंज्ञानाला विरोध केला जाऊ नये. सजगपणे नवतंत्रज्ञान स्वीकारावे. कालबाहय झालेले अभ्यासक्रम, पध्दती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी दत्ता बाळसराफ यांनी सांगितले.

जुने ते सर्व वाईट असे मानणे चूक ठरेल. तत्वज्ञानासारख्या अनेक महत्वाच्या विषयांची आजही तेवढीच गरज्‍ आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोककुमार म्हणाले की, माध्यमे बदलत असताना , त्यांनी जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेपासून दूर जाता कामा नये असे मत दत्ता गायकवाड यांनी मांडले.

कार्यकमाचे सूत्रसंचालन जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले. सदर कार्यक्रमास नवं महाराष्ट्र युवा अभियानाचे संघटक निलेश राऊत, यशवंतराव चव्हान प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, विजय काणेकर, डॉ. माया पाटील, प्रा अंबादास भासके, प्रा मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे आणि विद्यार्थी इत्यादींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्याची निमिर्ती व समकालीन समस्या या विषयावरती व्याख्यानसोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प्रा. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास महाराष्ट्र राज्याची निमिर्ती व समकालीन समस्या या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मा. युनुसभाई शेख असतील, तर प्रमुख उपस्थिती मा. पद्माकर कुलकर्णी यांची असेल. हा कार्यक्रम १ मे २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सिध्देश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे सुरू होईल. डॉ. गो. मा. पवार अध्यक्ष, राजशेखर शिवदारे कोषाध्यक्ष, दिनेश शिंदे सचिव, धर्मण्णा सादूल, दिलीपराव सोपल, दत्ता गायकवाड, दिपक साळुंखे आणि राहूल शहा यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने सोलापूरकर वासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

 मा. श्री. गो. मा. पवार
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, सोलापूर
 श्री. दिनेश शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft