चित्रपट चावडीतर्फे 'उदारणार्थ नेमाडे'सोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र सोलापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी कार्यक्रमांतर्गत अक्षय इंडिकर दिग्दर्शित उदारणार्थ नेमाडे हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मा. दिलीप सोपल साहेब सदस्य-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच मा. अक्षय इंडिकर दिग्दर्शक प्रमुख पाहूणे, डॉ. सदानंद भिळेगांवकर अध्यतक्ष रोटरी क्लब, डॉ. शरद पाटील अध्यक्ष-लायन्स क्लब, मा. संतोष ठोंबरे अध्यक्ष-मातृभूमी प्रतिष्ठान, मा. गणेश भंडारी अध्यक्ष-मायबोली प्रतिष्ठान, सौ. वैभवी बुडूख अध्यक्ष-लायनेस क्लब आणि मा. नागेश अक्कलकोटे अध्यक्ष-आनंदी यात्री प्रतिष्ठान यांची प्रार्थनिय उपस्थिती असेल.

शनिवारी दिनांक ५ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन बार्शी उद्घाटन समारंभ होईल. त्यानंतर तिथे उदारणार्थ नेमाडे हा चित्रपट दाखवला जाणार आहे. रविवारी दिनांक ६ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता भारत टॉकीज, दामाजी रोड, मंगळवेडा येथे उदारणार्थ नेमाडेचा दुसरा शो दाखवण्यात येणार आहे. सोमवारी दिनांक ७ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता कॉलेज ऑफ फार्मशी (शिवदारे कॉलेज). जुळे सोलापूर येथे उदारणार्थ नेमाडेचा तिसरा शो दाखवण्यात येणार आहे.

पाण्याचा प्रश्न सुटणे शाश्वत विकासासाठी आवश्यक
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे भूजल अभ्यास कार्यशाळा...


भूपृष्ठावरील पाण्याचे योग्य नियोजन वेळीच झाले नाही तर उद्या पश्चाताप करण्याशिवाय गत्यंतर नाही. पाण्याच्या प्रश्नावरील उपाययोजनेतूनच सुबत्ता येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणे शाश्वत विकासासाठी गरजेचे आहे. त्यासाठी कृतीशिलता वाढविण्याची गरज आहे, असा सूर जल जन जागर प्रकल्प भूजल अभ्यास कार्यशाळेत उमटला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सोलापूर विभागीय केंद्र व मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सोलापूर आकाशवाणी केंद्राच्यावतीने रविवार २१ मे रोजी कार्यशाळा पार पडली. उद्घाटनप्रसंगी आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. श्रीकांत येळेगावकर, राजशेखर शिवदारे, ज्येष्ठ शूगर्भशास्त्रज्ञ श्रीनिवास वडगबाळकर, प्राचार्य चिंचखेडे, कार्यशाळेचे प्रकल्प समन्वयक रजनीश जोशी यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटनपर समारंभादरम्यान बोलताना आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे म्हणाले, पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आता कमी पाण्यातील पिके घेण्याची गरज आहे. सोलापुरातील ऊस कारखान्यांच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकून ते म्हणाले, उसासाठी लागणा-या अतिरिक्त पाण्याचे नियोजन होण्याची गरज आहे. कमी पाण्यात अधिक पिके कशी घेता येतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. डॉ. गो.मा.पवार म्हणाले, या कार्यशाळेचे पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाचे मोल पटवून दिले आहे. त्यामुळे ही कार्यशाळा दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेचे प्रकल्प समन्वयक रजनीश जोशी यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेमागील भूमिका मांडली. उपलब्ध पाणी, सांडपाणी, पाण्याचे स्त्रोत याचा सांगोपांग अभ्यास करुन पुढच्या काळासाठी भूजलाचा समग्र अभ्यास यातून करता यावा, हा यामागील हेतू असल्याचे ते म्हणाले.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

 मा. श्री. गो. मा. पवार
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, सोलापूर
 श्री. दिनेश शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft