महाराष्ट्र राज्याची निमिर्ती व समकालीन समस्या या विषयावरती व्याख्यानसोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प्रा. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास महाराष्ट्र राज्याची निमिर्ती व समकालीन समस्या या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मा. युनुसभाई शेख असतील, तर प्रमुख उपस्थिती मा. पद्माकर कुलकर्णी यांची असेल. हा कार्यक्रम १ मे २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सिध्देश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे सुरू होईल. डॉ. गो. मा. पवार अध्यक्ष, राजशेखर शिवदारे कोषाध्यक्ष, दिनेश शिंदे सचिव, धर्मण्णा सादूल, दिलीपराव सोपल, दत्ता गायकवाड, दिपक साळुंखे आणि राहूल शहा यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने सोलापूरकर वासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

बँकेच्या अधिका-यांचा कार्यशाळेत सहभागसोलापूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हातील सहकारी बँकांचे अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापक यांच्या करिता 'एक दिवसीय कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले होते. बँकेच्या अधिक अधिका-यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

 मा. श्री. गो. मा. पवार
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, सोलापूर
 श्री. दिनेश शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft