पत्रकारितेची विश्वासार्हता वाढावी : दामले१३ डिसेंबर २०१६ रोजी विभागीय केंद्र सोलापूर व सोलापूर विद्यापीठ यांच्या सयुंक्त विद्यमाने महाराष्ट्राची पत्रकारिता या विषयावर सोलापूर विद्यापीठात जेष्ठ पत्रकार मा. निळू दामले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलुगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे सदस्य मा. दत्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार निळू दामले यांनी पत्रकाराने आपले राजकीय विचार बाजूला ठेऊन व भावनेच्या आधीन होऊन लेखन करू नये ते देशाला व समाजाला घातक आहे कारण पत्रकारिता म्हणजे त्या त्या क्षेत्राचे पूर्ण ज्ञान मिळून करावयाचे कार्य आहे. समाजात घडलेल्या घटनेची माहिती देणाऱ्या पत्रकाराला त्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे जर तसे नसेल तर ती बातमी अपूर्ण राहते. सध्या असे घडत नाही त्यामुळे माध्यमांची विश्वासाहर्ता कमी होत चालली आहे. ती वाढवण्याची जबाबदारी नव्या पत्रकारांवर आहे असे परखड मत याप्रसंगी निळू दामले यांनी व्यक्त केले. आपल्या व्याख्यानात महाराष्ट्राच्या पत्रकारितेचे अनेक दाखले दामले यांनी दिले. व्याख्यानानंतर पत्रकारिता व समाजशास्त्र विभागाचे विद्यार्थी यांच्याशी दामले यांनी थेट संवाद साधला. प्रश्न उतरांमुळे या कर्यक्रमास एक वेगळे स्वरूप आले आहे. याप्रसंगी विभागीय केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. मिश्रा, सामाजिक शास्त्र संकुलाचे सचिव डॉ. अशोक कुमार व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोळकर यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड यांनी प्रतिष्ठानच्या कामाची माहिती व निळू दामले यांचा परिचय प्रास्ताविकातून केला. कुलुगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. रविंद्र चिंचोळकर यांनी आभार मानले.

   

विभागीय केंद्र - सोलापूर

 मा. श्री. गो. मा. पवार
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, सोलापूर
 श्री. दिनेश शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft