'बाल चित्रपट चावडी' उत्साहात सुरू


अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'बाल चित्रपट चावडी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजचा कार्यक्रमाचा तिसरा दिवस असून ५.३० वाजता जल परी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. तसेच उद्या ४ जूनला ५.३० वाजता ब्रेक टाईम हा चित्रपट डॉ. काळेज् करिअर अकॅडमी, जाजू बिल्डींग, बाहेती हॉस्पिटल शेजारी, सायगाव नाका, पोखरी रोड, अंबाजोगाई येथे दाखविण्यात येणार आहे. १ जून आणि २ जूनला दाखवण्यात आलेल्या चित्रपटांना अधिक संख्येने मुलांची उपस्थिती होती.

१९ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन

अंबाजोगाई : मागील वर्षीच्या पावसाने थोडासा दिलासा दिल्यामुळे शेतकरी सावरतो ना सावरतो तोच यावर्षी पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी खचला आहे. अनेक शेतक-र्‍यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला. नैसर्गिक संकटामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथील मानवलोक संस्था, आई प्रतिष्ठान अंबाजोगाई, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मे रोजी अंबाजोगाई येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड (अंबाजोगाई) विभागीय केंद्र

बीड (अंबाजोगाई) विभागीय केंद्राचे कामकाज केंद्राचे अध्यक्ष श्री. डॉ. द्वारकादास शालीग्राम लोहिया व सचिव डॉ. नरेंद्र हिरालाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.

बीडमध्ये रंगणार पहिले जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलन

बीड विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अंबाजोगाई, बीड आणि सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले जिल्हास्तरीय मराठी बालसाहित्य संमेलन ९ आणि १० मार्च रोजी सानेगुरूजी साहित्य नगरी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यीक महावीर जोंधळे, उद्धाटक ज्येष्ठ साहित्यीक - भारत सासणे, प्रमुख अतिथी - दत्ता बाळसराफ आणि वसंत काळपांडे, प्रमुख उपस्थीती भारतभूषण क्षीरसागर आणि निलेश राऊत, कार्याध्यक्ष दीपा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थीती असेल.

कार्यक्रमाची रूपरेषा- गुरूवारी ९ तारखेला सायंकाळी ५ वाजता ग्रंथदिंडी, मार्ग : माळीवेस - टिळकरोड - धोंडिपुरा - बलभीम चौक - कारंजा - राजूरीवेस - छ. शिवाजी महाराज चौक मार्गी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास सांस्कृतीत कार्यक्रम होईल. १० तारखेला सकाळी उद्घाटन सोहळा. दुपारी १ ते २ बाल साहित्यीकाचे कवीसंमेलन, दुपारी २ ते ३ बाल साहित्यीकाचे कथाकथन, दुपारी ३.३० ते ४.३० निमंत्रीत लेखकांचे कथाकथन, दुपारी ४.३० ते ५.३० निमंत्रीत कवींचे कवीसंमेलन आणि सायंकाळी ५.३० वाजता समारोप कार्यक्रम असेल. अध्यक्ष डॉ. व्दारकादास लोहिया, उपाध्यक्ष श्री. दगडू लोमटे, सचिव नरेंद्र काळे, कोषाध्यक्ष उषाताई दराडे, अमीर हबीब यांनी सर्व रसिकांना या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा हि विनंती केली आहे.

   

विभागीय केंद्र - बीड (अंबाजोगाई)

 मा. डॉ. द्वारकादास शालीग्राम लोहिया
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, बीड
 डॉ. नरेंद्र हिरालाल काळे, सचिव

 ओमशांती कॉलनी, अंबाजोगाई, बीड
 कार्यालय : ९४२२७४२६२८

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft