यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे विभागातर्फे दिवाळी पहाट संपन्न...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे विभागातर्फे आज पहाटे सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न झाला. श्री जयंत नगरकर यांच्या नागरवादन जुगलबंदीने सुरुवात झाली, नंतर बंटी डान्स अकॅडेमी च्या मुलांनी कु. आर्य काकडे यांचे समवेत मल्हारी हे नृत्य सादर केले, नंतर फिटे  अंधाराचे जाळे हा श्री श्रीधर फडके यांचा कार्यक्रम झाला. यावर्षीचा दिवाळी पहाट पुरस्कार श्री. श्रीधर फडके व कु संस्कृती बालगुडे हीला श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे हस्ते महापौर श्री प्रशांत जगताप, श्री अजित निंबाळकर, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, प्रकाश पायगुडे यांचे उपस्थितीत देण्यात आला. पुणेकरांनी मोठा उपस्थिती यावेळी होती.

डॉ. दिलिप गरुड लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'पुस्तकावर
प्रश्नमंजुषेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न..

पुणे विभागीय केंद्र : २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावरील प्रश्नमंजुषा मध्ये ७५ शाळांमधील ३५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, त्यांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याशिवाय १. टीन एजर्सचे मनांत २. बुद्धी वर्धन (मन:शक्ती ) ३. आरोग्यम् धनसंपदा याशिवाय राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब या विषयावर प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण अन्य सेवक यांचेकडून दोन हजार शब्दसंख्या मर्यादेपर्यंचे निबंध मागविण्यात आले आहेत. त्यांतील विजेत्या शिक्षकांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.

डॉ. दिलिप गरुड लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुस्तकावर प्रश्नमंजुषा 
२४ सप्टेंबर २०१६ (शनिवार) रोजी...

पुणे विभागीय: केंद्रामार्फत दरवर्षी, इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यासाठी एखाद्या राष्ट्रीय पुढा-याचे आत्मचरित्रावर प्रश्न मंजुषा आयोजित केली जाते. यंदा राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावर ही परिक्षा घेण्यात येत आहे.

   

विभागीय केंद्र - पुणे

 मा. श्री. अजित निंबाळकर
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, पुणे
 श्री. अंकुश काकडे, सचिव

 सह्याद्री सदन, टिळक रोड, २१८३, सदाशिव पेठ
 पुणे - ४११०३०

 कार्यालय : ०२०-२४३३२६७६
 ईमेल : aijnimbalkar@hotmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft