वारली चित्रप्रशिक्षण कार्यशाळा

WhatsApp Image 2019 05 06 at 10.36.21 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाशिक विभागीय केंद्रातर्फे वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. ११ मे व रविवार दि. १२ मे रोजी पहिली बॅच आणि सोमवार दि.१३ मे व मंगळवार दि. १४ मे रोजी दुसरी बॅच होईल. सकाळी १० ते १ या वेळेत बेसिक कोर्स होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत ऍडव्हान्स कोर्स होणार असून त्यात कापडावर आणि मातीच्या पॉटवर वारली पेंटिंग कसे करायचे हे शिकविण्यात येणार आहे. क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळांमध्ये ५ ते ७५ वयोगटातील कलाप्रेमींना सहभागी होता येईल. बेसिक आणि ऍडव्हान्स आणि कॉम्बो कोर्स असे या कोर्सचे स्वरूप आहे. कार्यशाळेत सहभागी होताना पेन्सिल, पाण्यासाठी बाऊल, जुना रुमाल आणि पॅड आणावे. सहभागी सर्वांना आवश्यक साहित्य, पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी राजू देसले ७७२००५२५७२
, सचिन हांडे ७७२००५२५५७, ज्ञानेश्वर शिरसाठ ९६०४०६१७५८ व विनायक रानडे ९९२२२२५७७७ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी कार्यशाळेत सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातील शाश्वत कला शिकून कलानिर्मिती करण्याचा आनंद मिळवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जागर कवितांचा मधून जगण्याच्या विविध प्रश्‍नांचा वेध

5 4 2019 11 01 59 AM
जीवनातील विविध भावभावनांचे आविष्कार सामाजिक प्रश्‍न, जीवन जाणिवा, निवडणूक यावर कवींनी कवितांतून भाष्य केले. कविता हे माध्यम जगण्याच्या सर्व शक्यता अशक्यांना स्पर्श करतं आणि अनुभवाचा आविष्कार प्रखरपणे समोर आणते, याचीच ही प्रचिती होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नाशिक विभागीय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जागर कवितेचा - खुले कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कवि संमेलनाचे स्वागत व प्रस्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. ते म्हणाले की, कवी हा वर्तमानकाळाचा व समाज परिवर्तनाचा भाष्यकार असतो. तो आपल्या कवितेच्या माध्यमातून समकालाचे प्रश्‍न मांडतो. कविता लेखन ही साधना असून त्यातून वेगळा आशय व विचार मांडण्याची गरज आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी भीमराव कोते, विलास पगार, सदाशिव खांदवे व रामचंद्र काकड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कवी संमेलनाची सुरुवात अरुण सोनवणे यांच्या गझलने झाली. भंगूर जीवनाची नाही कुणास खात्री, सारे इथे उतारु, सारेच तीर्थयात्री...त्यानंतर रविंद्र मालुंजकर यांनी लेक लाडकी सर्वांची, लेक सावली विश्वाची, तिच्या आगमन वाजे रोज तुतारी सुखाची...या कवितेतून लेकीचे महत्त्व विशद केले. राज शेळके यांनी तिच्या डोक्यावर हात तुझी लाखाची कमाई सारं आयुष्य सरुन पुन्हा उरते रे आई...या कवितेतून आईचे थोरपण मांडले. नंदकिशोर ठोंबरे यांनी होय मी ब्ल्यु कॉलर मला लाज नाही वाटत त्याची माझी कॉलर ब्ल्यू असली तरी...यातून विदारक वास्तव मांडले.
कवी संमेलनात अमोल चिने, डॉ.गणेश मोगल, डॉ.एच.एस.मोरे, सुभाष सबनीस, अजय बिरारी, राधाकृष्ण साळुंके, नितीन कोकणे, गणेश पवार, भारती देव, लक्ष्मीकांत कोतकर, माणिकराव गोडसे आदी कवींनी कविता सादर केल्या.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft