छायाचित्र व स्केचेस प्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कलाक्षेत्रातही कौशल्य प्राप्त करता येते त्यासाठी परंपरेचे जतन आणि नव्याचा शोध घेण्याची धडपड कलावंतामध्ये असण्याची गरज आहे. कलेच्या निर्मितीतून स्वतःला आनंद तर मिळतोच पण त्यातून समाजाला विचारही देता येतो. छायाचित्र व स्केचेस प्रदर्शनातून हाच संदेश देण्याचा प्रयत्न युवा छायाचित्रकारांनी केला असे प्रतिपदान प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व विश्वास को-ऑप.बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मथुरा व वृंदावन येथील पारंपारिक होळी उत्सव व स्केचेसच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विश्वास ठाकूर पुढे म्हणाले की, नाशिकच्या अनेक कलावंतांमध्ये गुणवत्ता दडलेली आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे म्हणजेच त्यांच्यातल्या कलावंताला नवे अवकाश प्राप्त करून देणे होय असेही ते म्हणाले.
अनंत गुजराथी, अमित लव्हारे, निखिल देशमुख, अमोल शिंदे ह्या छायाचित्रकारांचे व आशिष देवपूरकर यांचे निवडक स्केचेस या प्रदर्शनात असून अनंत गुजराथी यांच्या मथुरा व वृंदावन येथील पारंपारिक होळी उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रांबरोबरच पोट्रेट फोटोग्राफी, लँडस्केप फोटोग्राफी, मॅक्रो (सूक्ष्म) फोटोग्राफीचा यात समावेश होता. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी विश्वास को-ऑप.बँकेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील, सुरेश वाघ, किशोर त्रिभुवन, कैलास आव्हाड, मंदार ठाकूर, रमेश गुजराथी, पौर्णिमा गुजराथी, रमेश चिखले, राजेंद्र शिंदे, ज्योती शिंदे, सुरेश लव्हारे, मंगला लव्हारे, प्रसाद देवपूरकर, संगीता देवपूरकर, चित्रकार बबन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नाशिककर कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

छायाचित्रांसह स्केचेसचे प्रदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑफ-.बँक लि नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी आणि रिसर्च इंस्टिट्यूट ,नाशिक सारस्वत बँक व रेडीओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सवांचे कलात्मक दर्शन घडवणाऱ्या अभिनव छायाचित्रांचे व स्केचेसच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वास को-ऑफ-बँक लि.,सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक येथे आज या कार्यक्रमाला सुरूवात झाली असून रविवारी सकाळी ११.०० ते रात्री ९.०० पर्यंत हे प्रर्दशन सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व विश्वास को-ऑफ-.बँकचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांचे शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. अनंत गुजराथी,अमित लव्हारे,निखील देशमुख,अमोल शिंदे, या युवा छायाचित्रकरांचे छायाचित्रे आशिष देवपूरकर यांचे निवडक स्केचेस या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft