शाहीर अनंत फंदी यांच्या कार्यावर व्याख्यानाचे आयोजन

WhatsApp Image 2019 05 10 at 3.16.24 PM

प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्षानिमित्त अनंत फंदी-चरित्र व कार्य या विषयांवर सुप्रसिद्ध लेखक प्रा. शिरीष गंधे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शनिवार, ११ मे २०१९ रोजी सायं. ६.०० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अनंत फंदी हे पेशवाईतील एक दरबारी कवी होते. सन १७४४ मधे जन्मलेल्या फंदींचा मृत्यू १८१९ मधे झाला. त्यांच्या मृत्यूला आता दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. होनाजी या तत्कालीन प्रतिभावंत कवीने अनंत कवनांचा सागरअशा शब्दात तारीफ केली आहे. अनंत फंदी हा मुळात तमासगीर शाहीर. बहुश्रुतता, वक्तृत्व आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे ते पुढे कीर्तनकार झाले. फंदींनी लावण्या, पोवाडे, कटाव आणि फटके रचले. त्यापैकी फक्त सात पोवाडे, आठ लावण्या आणि काही फटके आज उपलब्ध आहेत. श्लोक, ओव्या, आर्या आणि पदे अशाही रचना त्यांच्या नावावर आहेत. रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा आणि फटका या फंदींच्या काही गाजलेल्या रचना. फंदींना मराठीतील फटका या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको, संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको हा त्यांचा उपदेशपर फटका फार प्रसिद्ध आहे. 
विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक असून, संयोजक विनायक रानडे आहेत. तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे बालनाट्य शिबिराचे आयोजन

IMG 20190507 WA0000

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक यांच्या वतीने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबिराचेआयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींच्या जडण घडणीत शिक्षणाला जसे महत्त्व आहे तसे आजच्या जगात सभाधीटपणा, संभाषण कला, निरीक्षण क्षमता, एकाग्रता, सुप्त गुणांचा विकास, स्वत:ला सादर कसे करावे, सांघिकतेचे महत्त्व आदि विषयांचा समावेश असलेली शिबिरे गेली अनेक वर्षे समाजातील विविध स्तरातील मुला-मुलींसाठी लक्ष्मी पिंपळे घेत असतात. सदर शिबीर अभिनय व मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून घेतले जाते.
लक्ष्मी पिंपळे यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये अभिनय केला असुन त्यात खंडोबाच लगीन, क्रांतीचक्र, प्लाइंग क्वीनस्, मॅन वुमन अ‍ॅण्ड नेबर, ब्रेकींग न्यूज, दि बुद्धा, दर्दे डिस्को, माय डिअर शुभी, ‘तिरथ मे तो सब पानीअशा अनेक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. अनेक साहित्यकृतींचे अभिवाचन केले आहे. पिंपळे या भरतनाट्यम् विशारद आहेत.
सदर शिबीर ८ वर्षापुढील मुला-मुलींसाठी असून बुधवार १५ मे ते बुधवार २२ मे २०१९ या कालावधीत सायं. ५ ते ८ या वेळेत क्लब हाऊस (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सीविश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे. शिबीराच्या संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी राजू देसले-७७२००५२५७२, सचिन हांडे-७७२००५२५५९,ज्ञानेश्वर शिरसाठ-९६०४०६१७५८,विनायक रानडे-९९२२२२५७७७यांच्याशी संपर्क साधावा. या बालनाट्य शिबिरास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft