यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे बालनाट्य शिबिराचा समारोप

 नाट्यशिबीरातून स्वत:ला शोधण्याची व सुसंवादाची प्रक्रिया सुरू होते - डॉ. मनोज शिंपी

WhatsApp Image 2019 05 27 at 1.55.48 PM

आजच्या इंटरनेटच्या जगात मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात. संवाद हरवलेल्या या काळात नाट्य शिबीरातून सुसंवादाची स्वत:ला शोधण्याची प्रक्रीया नव्याने सुरू होते. तेच अशा शिबीरांचे यश आहे. असे प्रतिपादन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक,सारस्वत बँक लि.,विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट,रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन,ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबिराचेआयोजन क्लब हाऊस,सावरकरनगर येथे करण्यात आले होते. त्याच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. शिबीराची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.
डॉ. शिंपी पुढे म्हणाले की,मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. मुलांची मानसिकता निरोगी राहावी याकरीता त्यांना आवडत्या क्षेत्रात करियर करण्याची संधी द्यावी. त्यातून त्यांना जीवनाचा खर्‍या अर्थाने आनंद मिळेल.
शिबीर मार्गदर्शक लक्ष्मी पिंपळे म्हणाल्या की,मुलांमधील उपजत गुणांना नाट्यशिबीराच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असते व सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
यावेळी शिबीरार्थींनी विविध नाटीका व कविता सादर केल्या. त्यात माकड व टोपीवाला,लाकुडतोड्या व कुर्‍हाड,तसेच पाऊस,परीची शाळा,फुलपाखरू,सूर्य,चित्ता,पुस्तक हाती घेऊया आदी कवितांचा समावेश होता. त्यानंतर शिबीरार्थींना डॉ. मनोज शिंपी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

मानवी नातेसंबंध, अपुरेपण यांचा अविष्कारचार सख्य चोवीस मधून सादर

WhatsApp Image 2019 05 25 at 9.20.08 PM

मानवी नातेसंबंध,जगण्याची उत्कटता,जगण्यातले वैविध्यपण,माणूस म्हणून जगण्याची नेमकी गरज,काळाला पूरून उरणा-या नात्यांची उपयुक्तता,काळाचा वेग आणि कौटुंबिक अस्वस्थता यांचा अनोखा वेध चार सख्य चोवीसकथांच्या अभिवाचनातून रसिक घेत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि.,नाशिक,विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान,ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांच्या
ध्यानस्थकथेने अभिवाचनाची सुरुवात झाली. त्यानंतर सोनाली लोहार यांनी कालाय तस्मै नम:या कथेतून जगण्यातील गुंतवळ,अपुरेपण,आतली धुसपूस प्रभावीपणे मांडली. कथेतून आजूबाजूच चित्र जसेच्या तसे उभे राहत होते. संवादातील तरलता, भाषेचा स्वाभाविक वापर कथांची परिणामकारकता वाढवत होता.
सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, सोनाली लोहार या चौघी जणींनी हा कथा अविष्कार सादर केला. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक विनायक रानडे होते.
चार समविचारी,सहसंवेदना असणा-या मैत्रिणींनी कथामधून आजचं जगण्याचं नेमकं विश्व उभे केले. स्त्री लेखिकांनी अभिव्यक्तीचा नवा अविष्कार भाषेचे वेगळेपण घेऊन समोर आला.
हेमंत टकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,स्त्रियांनी केलेले लेखन हे नवी उर्मी आणि गरज घेऊन निर्माण होत आहे. त्यातून समाजाचं नेमकं प्रतिबिंब पडत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. हरी विनायक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजश्री शिंपी यांनी केले. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा सन्मान आ. हेमंत टकले यांनी, हर्षदा बोरकर यांचा सन्मान सारिका देशपांडे, निर्मोही फडके यांचा सन्मान विनायक रानडे, सोनाली लोहार यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांनी केला. आभार प्रदर्शन विनायक रानडे यांनी केले.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft