‘चित्रपट चावडी’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे  चित्रपटप्रेमींसाठी ‘दि फिफ्थ सील’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार ३ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध हंगेरीयन दिग्दर्शक झोल्टन फ्रॅब्री यांचा ‘दि फिफ्थ सील’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.

बुडापेस्ट, १९४४ दुसर्‍या महायुद्धाचा अखेरचा काळ. एक घड्याळजी, पुस्तकविक्रेता आणि सुतार असे तिघे मित्र एका बारमध्ये बार मालकाबरोबर मद्याचा आस्वाद घेत गप्पा मारत असतांना तिथे एक अनोळखी व्यक्ती येते. घड्याळजी एक सैंधांतिक प्रश्न सर्वांसमोर ठेवतो. त्यातुन त्या सर्वांचे जीवनच बदलून जाते. वरवर सोप्या वाटणार्‍या प्रश्नाच्या मागे सोपी उत्तरे नसतात. काय नक्की झाले ते पाहण्यासाठी जरूर या.
१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या रंगीत चित्रपटाचा कालावधी १०५ मिनीटे आहे. ‘दि फिफ्थ सील’ हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.मनोज शिंपी, कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ.कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, सौ.कविता कर्डक, गुरमित बग्गा, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुधीर संकलेचा व विक्रम मोरे यांनी केले आहे.

चित्रपट चावडीतर्फे क्नाईफ व्हॅन गॉग अ विथ जिनिअस

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत सुप्रसिध्द दिग्दर्शक फ्रॅन्काईस बरट्रेंड यांचा  क्नाईफ व्हॅन गॉग अ विथ जिनिअस हा चित्रपट दाखिवण्यात आला.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft