दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज
                                                     - विश्वास ठाकूर

IMG 20190607 WA0002

दिव्यांग बांधवांचे पुर्नवसन हा समाजासाठी मुलभूत जाणिवेचा भाग असून यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकत्त्वाचा दृष्टीकोन जोपासण्याचीही गरज आहे. त्यांच्यात आत्मविश्वास व बळ निर्माण करण्याबरोबरच त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अपंग हक्क विकास मंच, मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील गरजू दिव्यांग बंधु-भगिनींना आवश्यकतेनुसार लागणार्‍या कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यासाठी मोफत नाव नोंदणी व मोजमाप/तपासणी शिबीराचे आयोजन कुमुसाग्रज स्मारक येथे करण्यात आले होते. या तपासणी शिबीरामध्ये व्हिल चेअर, श्रवणयंत्र, कुबडी, एम.आर.किट, कॅलिपर, स्प्लिंट, जयपुर फुट, कमोड चेअर, वॉकर, चष्मा, एल्बो क्रचेस, वॉकिंग स्टिक, अंधचष्मा, अंधकाठी, ब्रेलकिट इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी विश्वास ठाकूर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आज सर्व क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपल्या कतृत्वाने नावलौकिक संपादन केला आहे व आपले वेगळेपण सिध्द केले आहे. समाजाचा आपण काही देणे लागतो. या भावनेने त्यांच्याशी आपण नाते जोडावे. शिबिरात ३०० हून अधिक दिव्यांग बंधु भगिनींनी सहभाग नोंदवला. 
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद नाशिक समाज कल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील म्हणाले की, दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना कार्यरत असून त्यांना अशा शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे.
शिबिरात तपासणी प्रकल्प समन्वयक-जितेंद्र दाभाडे , तंत्रज्ञ-वसीम खान व असिस्टंट तंत्रज्ञ कलीम शेख यांनी काम पाहिले.

चित्रपट चावडी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी वॅगॅबॉण्ड

WhatsApp Image 2019 05 31 at 11.22.13 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शुक्रवार ३१ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रान्स दिग्दर्शक अ‍ॅग्नेस वरदा यांचा वॅगॅबॉण्डहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
दक्षिण फ्रान्समध्ये ग्रामीण भागात एक तरूण मुलीचे प्रेत बर्फात गोठलेल्या अवस्थेत सापडते. तिच्या ओळखीबद्दल पोलीस अनभिज्ञ असतात. मग प्रवास सुरू होतो. तिच्या अनिर्बंध वागण्याचा, फिरण्याचा, तिच्या बेफीकीरीचा. दारिद्रय, गोठवून टाकणारी थंडी, भूक, असुरक्षितता यांच्याशी सामना करणारी कोण होती ही तरूणी? गुढ तसेच चक्रावुन टाकणारे अवहेलना व गैरवर्तनांना बळी पडणारे तिचे व्यक्तिमत्त्व चित्रपट संपल्यावरही तुमचा पाठलाग करत राहते. सन १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या फ्रेंच चित्रपटाचा कालावधी १०५ मिनिटांचा आहे.                          
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft