ओरिगामी कार्यशाळेत मुलांनी लुटला सृजनशीलतेचा आनंदनाशिक : कागदाचे विविध रंगांचे आकार आणि त्या आकारातून मनात दडलेल्या असंख्य मोरपंखी कलाकृती यांची अनोखी प्रचिती मुलांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑफ. बँक लि. नाशिक सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ओरिगामी कार्यशाळेचे प्रा. हेमंत चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव देण्यासाठी मनोरंजक पध्दतीने सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

कागदापासून पंख हलवणारा पक्षी, सूर्यपक्षी, समारंभाप्रसंगीचा बॅच, होड्या, जहाज, मोर, ससा, सौरऊर्जा पंख, खुर्ची, टोपी, जेवणाचा डबा, फुलांचे विविध प्रकार अशा रोजच्या जगण्यातील वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक करून उपस्थित मुलांकडून करून घेतले. ओरियामी कलेचा इतिहास मनोरंजनातून संदेश देणे हा असून हसत खेळत आनंदमयी जीवन जगण्यासाठी ह्या कलेचा उपयोग करावा असे श्री. चोपडे म्हणाले.

ओरियामी कला पर्यावरणपूरक असून कागदापासून पाहिजे तो आकार निर्माण करण्याचे कौशल्य यातून सहजरित्या करता येते. यासाठी सातत्य, सराव आवश्यक असून भूमितीय संकल्पना सोप्या पध्दतीने समजून देण्यासाठी ओरियामी कला उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

टि. व्ही. चॅनेल्सच्या जमान्यात हरवत चाललेल्या क्रिएटीव्हीटीला अशा शिबिरातून निश्चित दिशा मिळेल. मुलांमधील उपजत कला व कौशल्याचा वाव मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. अभ्यासाबरोबर एखादा जीवनात असावा त्यातून आनंद मिळत असतो. याप्रसंगी उपस्थित शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

बालनाट्य शिबीराचा समारोपनाशिक : मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी बालनाट्य शिबिर हे प्रभावी माध्यम आहे. त्यांच्यातील अविष्काराला हक्काचे व्यासपीठ यामुळे निर्माण झाले आहे. याच जाणिवेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार २ मे ते मंगळवार ९ मे २०१७ या कालावधीत बालनाट्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
लक्ष्मी पिंपळे यांनी अभिनय म्हणजे काय? आणि भूमिकेतून साकारणारे जिवंत नाट्य यांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. नवरसांचा नाट्यमयता निर्माण करण्यासाठी कसा वापर करता येतो यांविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. अभिनय करतांना देहबोली, आवाजातील चढउतार यांवर लक्ष केंद्रीत कसे करावे याबाबतही विविध प्रवेशातून मार्गदर्शन केले. अभिनय ही कला असून त्यातून मिळणारा आनंद नवे शिकविणारा असतो. प्रत्येकात कलावंत दडलेला असतो आणि त्याचा शोध घेण्याचे काम अशी शिबीरे करतात यावेळी लक्ष्मी पिंपळे यांनी ओमकार नाट्य शिबिरातून कसे व्यक्त व्हावे यांचे साभिनय प्रात्यक्षिक करून घेतले. त्यास शिबिरार्थींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराचा समारोप प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर व सौ. ज्योती विश्वास ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला व शिबीरार्थींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. याप्रसंगी मुलांनी सादरीकरणातून अभिनयाची चूणूक दाखवली. यात दिवाकरांच्या नाट्यछटा, गाढवाचं लग्न, प्राण्यांचं अद्भूत जग आणि त्यांची जगण्याची शैली, ‘ती फुलराणी’ मधील स्वगत, म्या बी शंकर हाय, या नाटिकेतील प्रवेशांचे सादरीकरण कविता वाचन प्रभावीपणे करण्यात आले.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft