सामाजिक पर्यावरणाचा समतोल रोखण्यासाठी
कॉर्पोरेट क्षेत्राचे आक्रमण रोखणे गरजेचे  - हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकारआज समाजात सर्वसामान्यांच्या जगण्यावर कॉर्पोरेट क्षेत्राचे वेगाने आक्रमण केले असून त्यांच्या हितासाठी राबविण्यात येणार्‍या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. ‘पब्लिक सेक्टर’ ह्या संकल्पनेचा नव्या जाणिवेतून अर्थ शोधण्याची आता वेळ आली आहे. कष्टकरी व शेतमजूर यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी निश्‍चित धोरण आखण्याची या काळात गरज आहे. त्यातून विकासाचे नवे स्वप्न उदयास येईल. लोकशाहीला ते बळकटी आणणारेच ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केले. महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला ज्येष्ठ पत्रकार, हेमंत देसाई यांच्या लोकशाही की कॉर्पोरेटशाही? या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘द स्ट्रेट स्टोरी’नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ३ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध अमेरीकन दिग्दर्शक डेव्हीड लींच यांचा ‘द स्ट्रेट स्टोरी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.

अमेरीकन दिग्दर्शक डेव्हीड लींच यांच्या तीन चित्रपटांचे खेळ आपण पहाणार आहोत. अमेरीकन चित्रपट म्हणजे हॉलीवूड, शोमनशीप, भव्यता, मोठी वितरणयंत्रणा व जगातील पहिल्या क्रमांकाचा चित्रपट व्यवहार. युरोपमध्ये सुरू झालेली नवचित्रपटांची चळवळ यथावकाश अमेरीकेत पोहोचली. डेव्हीड लींच हा तिच्या पहिल्या पिढीचा बिनीचा शिलेदार आहे.
डेव्हीड लींच खरंतर प्रथम चित्रकार व नंतर चित्रपट दिग्दर्शक त्याच्या चित्रपटातील विलक्षण चित्र व्यवस्था मानवी शरीराचे एक वेगळेच ‘दर्शन’ गूढ, अतिवास्तव वातावरण निर्मिती, अस्वस्थता आणि मानवी व्यवहारांचा अजब खेळ एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. आता अमेरीकेतीलच नव्हेतर जगातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंक्तित त्याचे मानाचे स्थान आहे. तसा स्ट्रेट स्टोरी हा त्याच्या चित्रपट सरळच म्हटला पाहिजे. इरॅझरहेड, ब्ल्यु वेलवेट, लॉस्ट हायवे, मुल हॉलंड ड्राईव्ह व इनलँड एम्पायर हे त्याचे वैशिष्ट्य पूर्ण चित्रपट. स्ट्रेट स्टोरीनंतर आपण त्याचे इलेफंट मॅन व मुल हॉलंड ड्राईव्ह हे चित्रपट पाहणार आहोत.

‘द स्ट्रेट स्टोरी’ १९९९ मध्ये अमेरीका येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ११२ मिनीटांचा आहे.

‘द स्ट्रेट स्टोरी’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft