‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘दिग्दर्शक इंगेमार बर्गमन फिल्म उत्सव’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १ सप्टेंबर व रविवार २ सप्टेंबर २०१८ रोजी सुप्रसिद्ध स्विडीश इंगेमार बर्गमन फिल्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर चित्रपट क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहेत.

इंगेमार बर्गमन यांचा सिनेमा जागतिक सिनेमा सृष्टीत क्लासिक किंवा अभिजात म्हणून ओळखला जातो. मानवी संबंधांची गुंतागुंत, अनेक मानव निर्मित संस्था व सामाजिक अनुबंध व त्यातील परस्पर व्यवहार यावर भाष्य करणारा त्यांचा सिनेमा अनुभव विश्व समृद्ध करणारा आहे. त्यांच्या सिनेमातील पात्रे व प्रतिमासृष्टी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. अत्यंत मनस्वी, कलंदर अशा बर्गमन यांनी तटस्थपणे व तीव्रपणे मानवी संवेदनांचा, सबंधांचा व व्यवहारांचा शोध घेतला.

प्रसिध्द साहित्यिक श्याम मनोहर यांची मुलाखतकुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिध्द साहित्यिक श्याम मनोहर यांच्या मुलाखतीचे कुसुमाग्रज स्मारक, स्वागत सभागृहात आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली.

आस्तिक - नास्तिक हिंदुत्ववादी-बिनहिदुत्ववादी, विवेकवादी-देवभोळे अशा सर्व प्रकारच्या माणसांची समाजात गरज असते. विचारसरणी कोणतीही असली, तरी माणसाच्या मुलभूत गरजा समानच असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे टोक गाठण्यात अर्थ नाही, असे मत प्रख्यात श्याम मनोहर यांनी मांडले.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft