चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी जाकू

WhatsApp Image 2019 05 03 at 7.02.16 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शनिवार ४ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रान्स दिग्दर्शक अ‍ॅग्नेस वरदा यांचा जाकूहा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
ही अ‍ॅग्नेस वरदा यांच्या चित्रपट दिग्दर्शक पती जॅक डेमी यांच्या बालपणाच्या गोष्टींवर आधारीत फिल्म आहे. लहानग्या जाकूला नाटक, सिनेमा, पपेट्सचे आकर्षक आहे. फ्रान्समधील एका गावात त्याच्या वडीलांचे मोटार दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्याने लहानपणीच ठरविले की आपण चित्रपट दिग्दर्शक व्हायचे. इकडे दुसर्‍या महायुद्धाचे पडघम वाजू लागतात. जाकू कॅमेरा मिळवतो आणि त्याचा स्वप्नवत प्रवास सुरू होतो, अशा विलक्षण प्रवासाची ही गोष्ट आहे.
सन १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या फ्रेंच चित्रपटाचा कालावधी १२० मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

कामगार दिनानिमित्त कवितेचा जागर...

WhatsApp Image 2019 04 30 at 11.40.57 AM

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने कवितेचा जागर होणार असून त्यात नाशिक व परिसरातील नवोदित व ज्येष्ठ कवी कवितेचा जागर करणार आहेत. बुधवार दि.१ मे रोजी सकाळी १० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे हे खुले कवी संमेलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. कवी संमेलनात नारायण सुर्वे कवी कट्टा, नाशिक कवी, काव्य मंच नाशिक, माझी कविता परिवार, संवाद नाशिक आणि नाशिकमधील सर्व कवी सहभागी होणार आहेत. कवी संमेलनाचे सुत्रसंचलन कवी रविंद्र मालुंजकर हे करणार आहेत. तरी या कवी संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft