नाशिक मध्ये चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘एम्प्टी नेस्ट’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ०४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॅनियल बर्मन यांचा ‘एम्प्टी नेस्ट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.

आयुष्याच्या एका टप्प्यावर जेव्हा मुले मोठी होऊन आपापल्या उद्योगात मग्न होतात व दुरही जातात तेव्हा पती पत्नीच्या जीवनात एक रीतेपणा येतो.

एम्टी नेस्टही अशाच एका नाटककाराची व त्याच्या गृहीणीची गोष्ट आहे. लिओनार्डो व मार्था अशा प्रसंगाला नक्की कसे सामोरे जातात याचीही नर्म विनोदी कथा आहे. जगातील सर्वच महानगर वासीयांची आयुष्याच्या त्या टप्प्यावर अशीच गत होत असावी.

सन २००८ मध्ये अर्जेंटीना येथे प्रदर्शित झालेल्या या स्पॅनिश चित्रपटाचा कालावधी ९० मिनिटांचा आहे.

हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft