३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या सुमधूर गितांची मैफल
‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’नाशिक : नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी, याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रृप, विश्वास हॅपीनेस सेंटर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि नाशिक विभागातर्फे विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत संगीतकार आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या समधुर गीतांची मैफल ‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’ या मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मैफिल सर्वांसाठी विनामुल्य आहे.रविवार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी सायं.६ ते ९ या वेळात विश्वास लॉन्स येथे सदर मैफल संपन्न होणार असून, मैफिलीचे निवेदन ख्यातनाम लेखक व संगीत अभ्यासक अंबरीश मिश्र हे करणार आहेत. व गीतांचे गायन रागिणी कामतीकर, मिलींद धटींगण, विवेक केळकर हे करणार आहेत.

सुप्रसिद्ध संगीतकार स्व. मदन मोहन यांच्या संगीतकारकीर्दीवर आधारीत कार्यक्रम मागे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अत्यंत दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण निवेदन अंबरीश मिश्र यांनी केले होते. त्यांचे निवेदनाने प्रेक्षकांना सुमारे साडेतीन तास खिळवून ठेवले होते.

विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, सारस्वत बँक, फॅ्रवशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमी, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास लॉन्स, यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम संपन्न होत आहे.

आर.डी. बर्मन यांनी १९७० च्या दशकात आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. कटी पतंग हा चित्रपट त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार अशा अनेक गायकांनी त्यांच्याकडे गाणी म्हटली आणि लोकप्रियता मिळविली.

आर.डी. बर्मन यांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आणून वापरायचं आणि इतर संगीतकारांनी त्याचा वापर आपापल्या संगीतात नंतर करायचा असा पायंडाच त्या काळी पडून गेला होता. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, गुलाबी आँखें जो तेरी देखी, त्यांनी संगीत दिलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यामध्ये तिसरी मंजील, पडोसन, हरे रामा हरे कृष्णा, अमर प्रेम, सिता और गिता, मेरे जीवन साथी, शोले, दिवार, खुबसूरत, कालीया, नमकीन, तेरी कसम, परिंदा, पुकार,१०४२ अ लव स्टोरी अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तरी या मैफिलीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर, समन्वयक विनायक रानडे, विवेकराज ठाकूर यांनी केले आहे. प्रवेश विनामुल्य आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft