‘नॉनव्हेज महोत्सवात’ चवदार अस्सल पदार्थांचा खवय्यांनी लुटला आनंद

रविवारचा दिवस मित्र परिवार, कुटूंबियांसमवेत नॉनव्हेज पदार्थांची लज्जत घेत गप्पांसोबत एक आनंददायी अनुभव खवय्ये घेत आहेत. नॉनव्हेज पदार्थांची अनोखी चव प्रत्येकाला हवीहवीशी वाटत आहे. हळूवार थंडीसोबत ‘विश्वास लॉन्स’ येथे नॉनव्हेज महोत्सवात प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होत आहे. गृ्रप-ग्रृपने महोत्सवात खवय्ये येत आहेत. सुट्टी खर्या अर्थाने कारणी लावत आहेत खवय्ये गिरीचा खर्या अर्थाने माहौल तयार झाला आहे. नॉनव्हेज पदार्थांमध्ये असलेले वैविध्य अनुभवास मिळत आहे.
मटका दम चिकन, चिकन पकोडा, चिकन सोसेज, फिश टिक्का, फिश मसाला फ्राय अशा वैशिष्ठपूर्ण पदार्थांची चंगळ विविध स्टॉलवर उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रीयन, भारतीय खाद्य परंपरेत नॉनव्हेज पदार्थांचे वेगळेपण टिकून आहे ते त्यातील अस्सल झणझणीत मसाले व तयार करण्याच्या पद्धतीमुळे. तोच अनुभव खवय्यांना नॉनव्हेज महोत्सवात येत आहे. महोत्सवाला आजही खवय्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. स्वादिष्ट मसालेदार मटन, चिकन आणि फिश यांचे शंभरहून अधिक प्रकार खास खवय्यांसाठी पर्वणी ठरले आहेत. नाशिक शहराच्या गतीमान विकासात नवे ‘फुड कल्चर’ निर्माण होत आहे. वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थांचे चवीचे वेगळे दालनच यानिमित्ताने खुले झालेले आहे.

‘विश्वास हॅपीनेस सेंटर’ ‘विश्वास ग्रृप’ तर्फे ‘विश्वास संकल्प आनंदाचा’ उपक्रमार्तंगत अस्सल चवदार झणझणीत चवींचा मिलाफ असलेला ‘नॉनव्हेज महोत्सव 2017’ चे आयोजन करण्यात आले आहे.विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 23 डिसेंबर, रविवार 24 डिसेंबर व सोमवार 25 डिसेंबर 2017 रोजी संपन्न होत आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळात विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे संपन्न होत आहे. महोत्सवाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची आहे. महोत्सवाचे संयोजक विनायक रानडे, विवेकराज ठाकूर आहेत.
सदर महोत्सवाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर किरण विंचुरकर यांचे ‘भरोसा केटरर्स’ असून सी फूड पार्टनर ‘कोकण करी’ असून, कॅफे पार्टनर ‘कॅफे क्रेम’ इंदिरानगर हे आहेत. वाईन पार्टनर ‘यॉर्क वाईनरी’ हे आहेत. शुद्ध व सात्विक शाकाहारींसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. हे महोत्सवाचे वेगळेपण ठरावे. महोत्सवात स्वादिष्ट मसालेदार मटण, चिकन आणि फिश अशा नॉनव्हेजचे 100 पेक्षा अधिक पदार्थ असणार आहे. त्यात ब्लॅक चिकन लोणचं, मटका चिकन, खपसा, मटका दम चिकन, चिकन पकोडा, लोबस्टर, ऑईललेस तंगडी, चिकन चीज रोट, मंदी चिकन राईस, चिकन दाबेली, चिकन सोसेज, फिश खर्डा, फिश खिमा, फिश बिर्याणी, फिश टिक्का, कोस्टल साईड फिश तवा फ्राय, फिश मसाला फ्राय, प्रॉन्स चिल्ली, कुझीन फिश पुलीमंची, फिश रवा फ्राय, मटन, मटन बिर्याणी व सौदी डिशेस, मंगोलियन स्टाईल कोस्टल, शिरकुर्मा आदी पदार्थांची रेलचेल आहे. महोत्सवानिमित्त विश्वास ग्रृप तर्फे उत्कृष्ट गायक/गायिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे संयोजक सुप्रसिद्ध संगीतकार संजय गीते आहेत. स्पर्धा रोज सायंकाळी 6 ते 9 वेळेत संपन्न होत आहे.
नॉनव्हेज महोत्सवात जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक विश्वास ठाकूर, विनायक रानडे 9922225777, विवेकराज ठाकूर 9028089000 यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft