‘चित्रपट चावडी’ नाशिक तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ' दि चाईल्ड'



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार १९ मे २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध बेल्जियम दिग्दर्शक जॉ पिएरे आणि ल्युक दार्दान यांचा ‘दि चाईल्ड’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.


आपल्या वास्तववादी शैलीने आणि वैशिष्टपूर्ण छायाचित्रण पध्दतीने गोष्ट सांगणारे दिग्दर्शक द्वय युरोपमध्ये तसेच जगभर प्रसिध्द आहेत. दि चाईल्ड मध्ये ब्रुनो व सोनिया या तरुण पे्रमिकांची गोष्ट आहे. ब्रुनो हा रस्त्यावरचा भुरटा चोर आहे व या दोघांचे जीवन बेल्जियममधील सोशल वेल्फेअर योजनांवर अवलंबून आहे. अत्यंत उनाड आणि दिशाहीन जगणार्‍या या तरुण जोडप्याच्या आयुष्यात अपरिहार्यपणे मुलाचे आगमन होते. त्यातून काय नाट्य उभे राहते हे पहाण्यासाठी जरुर या. सन २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९० मिनीटांचा आहे. दि चाईल्ड हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft