छायाचित्रांसह स्केचेसचे प्रदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑफ-.बँक लि नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी आणि रिसर्च इंस्टिट्यूट ,नाशिक सारस्वत बँक व रेडीओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सवांचे कलात्मक दर्शन घडवणाऱ्या अभिनव छायाचित्रांचे व स्केचेसच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वास को-ऑफ-बँक लि.,सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक येथे आज या कार्यक्रमाला सुरूवात झाली असून रविवारी सकाळी ११.०० ते रात्री ९.०० पर्यंत हे प्रर्दशन सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व विश्वास को-ऑफ-.बँकचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांचे शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. अनंत गुजराथी,अमित लव्हारे,निखील देशमुख,अमोल शिंदे, या युवा छायाचित्रकरांचे छायाचित्रे आशिष देवपूरकर यांचे निवडक स्केचेस या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे 
चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘दी बॉईज ऑफ द पॉल स्ट्रीट’नाशिक
: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार १७ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध हंगेरीयन दिग्दर्शक झोल्टन फ्रॅब्री यांचा ‘दी बॉईज ऑफ पॉल स्ट्रीट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.

सन १९०० मध्ये बुडापेस्ट मधील शाळकरी मुलांच्या दोन गटांमध्ये एका मोकळ्या जागेच्या ताब्यासाठी संघर्ष होतो. खरे तर मोकळे मैदान व शाळकरी मुले ही देश आणि सैनिक सेना यांची प्रतिकेतर नाहीत ना? लहान मुलांच्या खेळातुन काही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या सिनेमातुन देण्यात आला आहे. वरवर सोप्या वाटणार्‍या प्रश्‍नाच्या मागे सोपी उत्तरे नसतात. काय नक्की झाले ते पाहण्यासाठी जरूर या. १९६९ मध्ये हंगेरी येथे प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा कालावधी ११० मिनीटे आहे.‘दी बॉईज ऑफ पॉल स्ट्रीट’ हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.मनोज शिंपी, कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ.कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, सौ.कविता कर्डक, गुरमित बग्गा, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुधीर संकलेचा व विक्रम मोरे यांनी केले आहे.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 श्री. विलास लोणारी, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

     

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft