‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘दिग्दर्शक इंगेमार बर्गमन फिल्म उत्सव’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १ सप्टेंबर व रविवार २ सप्टेंबर २०१८ रोजी सुप्रसिद्ध स्विडीश इंगेमार बर्गमन फिल्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर चित्रपट क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहेत.

इंगेमार बर्गमन यांचा सिनेमा जागतिक सिनेमा सृष्टीत क्लासिक किंवा अभिजात म्हणून ओळखला जातो. मानवी संबंधांची गुंतागुंत, अनेक मानव निर्मित संस्था व सामाजिक अनुबंध व त्यातील परस्पर व्यवहार यावर भाष्य करणारा त्यांचा सिनेमा अनुभव विश्व समृद्ध करणारा आहे. त्यांच्या सिनेमातील पात्रे व प्रतिमासृष्टी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. अत्यंत मनस्वी, कलंदर अशा बर्गमन यांनी तटस्थपणे व तीव्रपणे मानवी संवेदनांचा, सबंधांचा व व्यवहारांचा शोध घेतला.

स्व. भा. ल. भोळे स्मृती व्याख्यानमाला संपन्न..

नागपूर विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर, आधार बहुउद्देशिय संस्था, नागपूर व महात्मा गांधी स्मारक निधीच्या संयुक्त विद्यमाने 'विवेकवादी जगणे खरंच इतके कठीण आहे का?" या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दापोलीचे कार्यकर्ते मा. मुक्ता दाभोळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. ३० सप्टेंबर २०१६ रोजी सायं ६.०० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे करण्यात आले. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र. नागपूरचे अध्यक्ष मा. डॉ. गिरीश गांधी अध्यक्षस्थान होते.

   

 विभागीय केंद्र - नागपूर

 मा. श्री. गिरीश गांधी
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नागपूर
 श्री. प्रमोद मुनघटे, सचिव

 द्वारा : वनराई, राष्ट्रभाषा संकुल,
 मुकबधीर विद्यालय जवळ, शंकर नगर चौक,
 नागपूर - ४४९०१०
 कार्यालय : ०७१२-२२६११६३
 ईमेल : vanaraingp@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft