साहित्य मंदिर सभागृहात रंगला ‘स्वर तीर्थ’...

IMG 20190224 WA0002

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे पु. ल. देशपांडे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मेघ मल्हार यांचा ‘स्वर तीर्थ’ हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी साहित्य मंदिर सभागृह, वाशी येथे विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. गायिका सोनाली कर्णिक, दीप्ती रेगे, सानिया पंडित यांनी स्वरसाज चढविला त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. यावेळी नचिकेत देसाईं यांनी कानडा राजा पंढरीचा हा ग.दि.मा., बाबुजींचा अभंग प्रस्तुत केला. या मंत्रमुग्ध संगीतमय कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ मालदार, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, गझलकार अप्पा ठाकूर, पंडित आगरकर बुवा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ अशोक पाटील, कुसुमाग्रज वाचनालय नेरुळचे अध्यक्ष व कवी ललित पाठक आदि उपस्थित होते.

साहित्य मंदिर सभाग्रृहात रंगणार ‘स्वरतीर्थ’..

IMG 20190203 WA0047

पु. ल. देशपांडे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मेघ मल्हार यांचा ‘स्वरतीर्थ’ हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. साहित्य मंदिर सभाग्रृह, वाशी येथे आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणार्या या दर्जेदार कार्यक्रमाचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे.

   

विभागीय केंद्र - नवी मुंबई

मा. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष विभागीय केंद्र, नवी मुंबई
डॉ. अशोक पाटील, सचिव
द्वारा प्रमोद कर्नाड, ०३/ए-१, अलकनंदा, 
कै. सौ. हिर कर्नाड मार्ग, सेक्टर-१९ए
नेरुळ, नवी मुंबई - ४००७०७.
संपर्क : ९८१९३३९९४४ /९८६७६३३९९
ईमेल : pramodkarnad@gmail.com, 
ycpnavimumbai@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft