ठाणे येथे २७ नोव्हेंबरला 'यशवंत व्याख्यान माला'ठाणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र ठाणे आणि बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'यशवंत व्याख्यान माला' या कार्यक्रमांर्गत हितगुज नव्या वैज्ञानिक पिढिशी या विषयावर व्याख्यान सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ वैज्ञानिक-डॉ. बाळ फोंडके हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे एक द्रष्टे व्यक्तीमत्व होते. ज्ञान, विज्ञान, संशोधन, कला, साहित्य, शिक्षण, क्रिडा, सामाजिक सुधारणा या प्रत्येक घटकाबाबत त्यांना विलक्षण आस्था होती. भावी समाजाच्या उभारणीसाठी, तरुण पिढीकडून त्यांना विशेष अपेक्षा होत्या. या दृष्टीकोनातून यशवंतराव प्रतिष्ठान. ठाणे जिल्हा केंद्राने मागील वर्षापासून 'यशवंत व्याख्यान माला' सुरू केली आहे. हा कार्यक्रम बा.ना.बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथे होणार असून विभागीय केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले आणि बा.ना.बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर या अधिक लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

शिक्षिकांचा गौरवयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय ठाणे केंद्रातर्फे नूकताच शिक्षकदिन साजरा करण्यात आला.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणा-या पाच शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. यात छाया घाटगे, वर्षा वैद्य, प्रज्ञा जोशी, गीता बलोदी आणि रूचिका इरकशेट्टी या शिक्षकांचा समावेश होता. या सर्व शिक्षिका दिव्यांग मुलांना धडे देतात.

हा सत्कार समारंभ नीला सत्यनारायण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नीला सत्यनारायण म्हणाल्या, समाजात दिव्यांग मुलांना शिकवणा-या ज्या संस्था आहेत, त्या सर्व महिला चालवत आहेत. या संस्था चालवणे किती कठीण काम आहे, हे मी स्व:त घेतलेल्या अनुभवावरून सांगू शकते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि शिक्षिकांच्या मुलाखती मोनिका नाले यांनी घेतल्या.

   

विभागीय केंद्र - ठाणे

 मा. श्री. मुरलीधर नाले
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
 १६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
 चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

 कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
 ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft