ज्येष्ठांचा कार्यगौरव

ठाणे विभाग : ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ठाणे शाखेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रामध्ये सक्रिय असणा-या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' हे कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत.

ज्येष्ठ नागरिक हे आपल्या आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये सर्वांना मार्गदर्शन करत असतात. आयुष्यभर मेहनत करुन सतत दुस-यांसाठी झटणा-या ज्येष्ठ नागरिकांचा दिवस साजरा करावा, या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वयामध्येही सक्रिय असणा-या लोकांचा सामान्यांना परिचय व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी मान्यवरांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची निवड होणार असून त्यांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. मृदुला दाढे-जोशी, निलेश निरगुडकर यांच्या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रमा पार पडेल.

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी व्याख्यान..स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी परंपरांचे संचित घेऊन आधुनिकतेकडे वहावत जाणा-या यशवंतराव चव्हाणांच्या जीवनदृष्टीचा वसा आणि वारसा पुढे चालविण्याच्या दृष्टीने त्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. मनिष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजिक केला. त्याप्रसंगी प्रा. नितीन आरेकरांनी कैद्यांना यशवंतराव चव्हाणसाहेबांची घरची गरिबीची परिस्थिती असून देखील परिस्थितीशी झुंज देऊन आपले शिक्षण कसे पूर्ण केले व राजकारणात शिरुन ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळले. केंद्रात विविध खात्यांचे मंत्री ते उपपंतप्रधान अशी पदे कशी भूषविलीत यावर प्रकाश टाकला. परिस्थिती बिकट होती म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला नाही. म्हणून त्यांनी कैद्यांना आवाहन केले, की तुम्ही बाहेर पडल्यावर स्वावलंबी व्हा. चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. अध्यक्षस्थानी असलेल्या उपायुक्तांनी कैद्यांना आश्वासन दिले की त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहाता यावं म्हणून विविध कंपन्यांच्या योजनेखाली छोटे छोटे तांत्रिक अभ्यासक्रम पुरे करावेत. त्यासाठी त्यांच्याशी कारागृहातून बाहेर पडल्यावर संपर्क साधावा व पुढील कालावधीत स्वाभिमानाचे आयुष्य जगावे. शेवटी केंद्र अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कारागृहाचे अधिक्षक यांना 'कृष्ठकाठ' च्या प्रती भेट देण्यात आल्यात.

   

विभागीय केंद्र - ठाणे

 मा. श्री. मुरलीधर नाले
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
 १६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
 चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

 कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
 ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft