ठाणे विभागीय केंद्रामार्फत 'विचारकुंकू' उपक्रम...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या ठाणे विभागीय केंद्र आणि रोटरी कल्ब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विचारकुंकू’ ह्या एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १७ फेब्रुवारीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे, सहयोग मंदीर, दुसरा मजला, ठाणे पश्चिम येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

महिला सक्षमीकरणाच्या हेतूने नामवंत प्रतिष्ठीत महिलांचे मार्गदर्शन सर्वसामान्य महिलांना मिळावे या कारणास्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांची मुलाखत प्रा. अनुया धारप आणि पूजा प्रधान घेणार असून 'श्वास' चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे यांचे कथाकथन व  रोटरी सामाजिक श्रेष्ठता पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे ठाणे प्रतिष्ठान विभागाचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुस्कर आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नार्थचे अध्यक्ष रणवीरसिंह राठोड यांनी केले आहे.

यशवंत व्याख्यानमाला संपन्न...दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी नियोजनानुसार 'यशवंत व्याख्यान' मालेचे थाटामाटात उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या 'मुलभूत विज्ञानाच्या संशोधनाच्या नव्या दिशा' या व्याख्यान्याच्या पहिल्या पुष्पाने झाले. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्या उपस्थितीत यशवतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,ठाणे केंद्राचे अध्यक्ष श्री. मुरलीधर नाले यांच्या प्रास्ताविकाने सुरुवात झाल्यानंतर कुलसचिवांनी त्यांचे मनोगत मांडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या कृषी व सहकार विभाग, पुणे यांनी घेतलेल्या निबंध स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पुरस्कार दिल्यानंतर ' यशवंतराव चव्हाण : जडण घडण' या पद्मश्री मधु मंगेश कर्णि, श्री अरुण साधू आणि प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. अनिल काकोडकर व्याख्याने श्रौते मंत्रमुग्ध झाले आणि ख-या अर्थाने यशवंतव्याख्यानमालेचा शुभारंभ झाला.

   

विभागीय केंद्र - ठाणे

 मा. श्री. मुरलीधर नाले
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
 १६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
 चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

 कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
 ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft