ठाणे विभागाचा वार्षिक अहवाल ...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे केंद्र, १ एप्रिल २०१७ पासून अस्तित्वात आले. त्यावेळी उद्घाटनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई सरचिटणीस शरद काळे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर काव्यसंमेलन झाले.

ठाणे प्रतिष्ठानने यशस्वी रितीने राबविलेले उपक्रम पुढीलप्रमाणे :

२९ जुलै २०१६ रोजी ज्येष्ठ नाटककार श्री. अशोक समेळ यांची ज्येष्ठ कवी श्री. अशोक वागवे यांनी खुमासदार मुलाखत घेतली. यावेळी अशोक समेळांनी नटसम्राटमधील एक उच्चांकाचा प्रवेश करून दाखवला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुभाष शेंडे यांची मुलाखत प्रा. नितीन आरेकरांनी घेतली.
१५ ऑगस्टच्या मुहूर्तावर ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबद्दल व त्यांच्या कार्याचा परिचय ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त श्री. मनिष जोशी आणि प्रा. नितिन आरेकरसरांनी आपल्या व्याख्यानातून करून दिला.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ३० सप्टेंबरच्या सायंकाळी मा. श्री. जी. वी. पिंगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील विविध क्षेत्रीतील ६ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सौ. मृदुला दाढे जोशी सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात 'यशवंत व्याख्यानमाला' या उपक्रमाची सुरूवात झाली. या उपक्रमाची सुरूवात प्रसिध्द शास्त्रज्ञ पदमविभूषण डॉ. श्री. अनिल काकोडकर यांच्या 'मुलभूत विज्ञानाच्या संशोधनाच्या नव्या दिशा' या व्याख्यानाने झाली. मुंबई विद्यापिठाच्या अखत्यारीतील असलेल्या महाविद्यालयातील सुमारे ५५० ते ६०० विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ मिळाला. यावेळी पदमश्री मधु मंगेश कर्णिक, अरूण साधू, प्रा. पु. द. कोडोलीकर संपादित अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ' यशवंतराव चव्हाण : जडण घडण' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

१७ फेब्रुवारी २०१७ रोजी विचारकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त पहिल्या स्त्री राज्य निवडणूक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांची खुमासदार मुलाखत प्रा. अनुया धारप व कु. पूजा प्रधान यांनी घेतली. या प्रदिर्घ मुलाखतीमुळे महिला वर्गाला श्रीमती नीला सत्यनारायण याचा प्रदिर्घ शासकीय अनुभवाची तसेच त्यांच्या साहित्यातील योगदानाची आणि त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती मिळाली. मुलाखतीनंतर सौ. माधवी घारपुरे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम रंगला.

'विचारकुंकू' कार्यक्रम संपन्नयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या ठाणे विभागीय केंद्र आणि रोटरी कल्ब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विचारकुंकू’ अभिनव उपक्रम नूकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे, सहयोग मंदीर, ठाणे पश्चिम येथे संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांची मुलाखत प्रा. अनुया धारप आणि पूजा प्रधान यांनी घेतली.

महिला सक्षमीकरणाच्या हेतूने नामवंत प्रतिष्ठीत महिलांचे मार्गदर्शन सर्वसामान्य महिलांना मिळावे या कारणास्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला त्यांनी इतर राज्यांच्या तूलनेत महाराष्ट्रातून केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परिक्षेची तयारी महाविद्यालयात असल्यापासून करावी लागते. आज दक्षिणेतील भरपूर मुले परिक्षा पास झाल्याचे आपल्या नजरेस पडते.
त्यानंतर त्यांनी त्यांच्या ४२ वर्षाच्या कालावधीत घडलेल्या काही गोष्टीचा त्यांनी उलघडा केला, पुरूषांच्या तूलनेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. शासनाच्या महत्त्वाच्या विभागात काम करण्याची संधी दिली जात नाही. राजकीय पुढा-यांचा देखील स्त्री अधिका-याकडून काम करून घेता येईल का अशी शंका असते. अशा ब-याच गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमाला ठाणे प्रतिष्ठान विभागाचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुस्कर आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नार्थचे अध्यक्ष रणवीरसिंह राठोड, सचिव अमोल नाले, यांची प्रमुख उपस्थिती होती.

   

विभागीय केंद्र - ठाणे

 मा. श्री. मुरलीधर नाले
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
 १६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
 चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

 कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
 ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft