”भारतीय संविधान दिना” निमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर..



२६ नोव्हेंबर २०१६ ”भारतीय संविधान दिना” निमित्त सॅम मित्र मंडळ व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभाग जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने मु. पेडली, ता.सुधागड , जिल्हा रायगड इथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . खारघर ,नवीन मुंबई येथील नामांकित यरला रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर डॉ. प्रशांत जगताप व टीम, तसेच सुधागड पी.अस.सी. मधून डॉ.मुळे व सौ. डॉ. भिडे व टीम रुग्णांच्या चेकप साठी उपस्थित होते. डायबेटीस, ब्ल्डप्रेशर, मुल्व्याद, हर्निया, अॅपेंडीक्स, मासिक पाळी , गर्भ पिशवी विकार, गर्भावती महिला, डोळे तपासणी, इत्यादी विकारांवर तपासणी केली गेली. ”भारतीय संविधान दिना” चे औचित्य साधून, शिबिर दरम्यान उपस्थित प्रत्येक व्यक्तीला भारताचे प्रीअॅम्बल दिले गेले व सामुहिक वाचनाच्या माध्यमातून ‘ समानता व बंधुत्वाचा निरोप देण्याच प्रयत्न सॅम मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन खामकर साहेब यांनी केले आहे. अश्या शिबाराचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे रायगड जिल्हाध्यक्ष मा.अभिजित दादा देशमुख यांनी केले आहे. युवा कार्यकर्ते नंदकीशोर शिंदे, संदीप ठाकूर, प्रणीत कडू, बाजीरंग कुर्ले, दर्शन तळेकर, सौरभ खामकर, प्रशांत दळवी, रुपेश कुर्ले, राज तळेकर, शुभम मेणे, सुनील कुवर, प्रवीण खानेकर, शिवराज खामकर, प्रशांत सगळे, विजय देशमुख यांनी सक्रीय सहभाग घेतला. कार्यक्रमास तळेकर गुरुजी, मेने सर, विजयजी जाधव, सचिन झुन्झाराव, निलेश देशमुख, पोलीस पाटील देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळावा व चालण्याची स्पर्धा..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभागीय केंद्र व रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर 'ज्येष्ठ नागरिक दिना' च्या निमित्ताने ज्येष्ठांसाठी आनंद मेळावा भारत शिक्षण मंडळाच्या ठाकूर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या आनंद मेळाव्यानिमित्त सर्व ज्येष्ठांसाठी चालण्याची स्पर्धा भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ त्याच दिवशी सायं ०३.३० वा. भारत शिक्षण मंडळाचे ठाकूर सभागृहात ज्येष्ठांसाठी आयोजित आनंद मेळाव्यात होणार आहे. या आनंद मेळाव्यात सौ. वैजयंती पाटील तसेच श्री. संजय पाटणकर व श्री. प्रविण डोंगरे यांच्या गायनाचा कार्यक्रम व ज्येष्ठांसाठी प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेत भाग घेऊन ज्येष्ठांसाठी आयोजित केलेल्या आनंदमेळाव्याला दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी उपस्थित रहाण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आले आहे.

   

विभागीय केंद्र - कोकण

 मा. श्री. शेखर निकम
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कोंकण
 ३१२२, अन्नपूर्णा,
 गणपती मारुती मंदिरा समोर,
 टिळक आळी, जिल्हा रत्नागिरी,
 कार्यालय : ०२३५२-२२२३१२
 ईमेल : ycpratnagiri@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft