'विज्ञानगंगा' मधील ऑलिम्पियाड व्याख्यान बदलापूर मध्ये संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभाग ठाणे जिल्हा, मराठी विज्ञान परिषद व युवाराज प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २६ नोव्हेंबर २०१६ रोजी. सायं ५ वा. 'विज्ञानगंगा' या मालिकेतील विज्ञान ऑलिम्पियाड या विषयाबद्दल डॉ. रेखा वर्तक यांचे व्याख्यान बदलापूर येथील कात्रप परिसरातील श्रीजी सेंटर येथे झाले.

बायोलॉजी ऑलिम्पियाड प्रोग्राम १९९० साली सुरु झाला आहे. विज्ञान ऑलिम्पियाड ही निखळ व निकोप अशी शैक्षणिक स्पर्धा आहे असे प्रतिपादन डॉ. रेखा वर्तक यांनी बदलापूरात केले.
एकाद्या विषयाबद्दल माहिती असणे त्यापेक्षा त्या विषयात ज्ञान मिळणे जास्त महत्वाचे असते. असेही त्या म्हणाल्या कार्यक्रमाची सुरुवात २६/११ च्या दहशतवादी कृत्यात वीरमरण आलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहून झाली. तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रियंका आशिष दामले यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॅ. आशिष दामले यांच्या वतीने सचिव पाटील यांनी केले.

   

विभागीय केंद्र - कोकण

 मा. श्री. शेखर निकम
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कोंकण
 ३१२२, अन्नपूर्णा,
 गणपती मारुती मंदिरा समोर,
 टिळक आळी, जिल्हा रत्नागिरी,
 कार्यालय : ०२३५२-२२२३१२
 ईमेल : ycpratnagiri@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft