दासू वैद्य लिखित मेळाललित लेखसंग्रह प्रकाशन...

ललित लेख म्हणजे विचार प्रवाहाची अभिव्यक्ती:सुधीर रसाळ

68394602 1173127932895517 123351404906545152 n

 

ललित लेखन हा वाङमय प्रकार नसून त्याला स्वतंत्र रुप आहे. स्वैर,सैल असला तरी त्यांच्याअंतर्गत तेवढीच संगती असते. ललित लेख हा लेखकाच्या विचार प्रवाहाची अभिव्यक्ती आहे. दासू वैद्य यांना मेळा मध्ये काव्याची भाषा बाजूला ठेवून लालित्यपूर्ण लेखन केले आहे. त्यामुळे काव्य आणि गद्य या दोन्ही प्रकारांत त्यांचे तेवढेच प्रभुत्व दिसून येते,असे प्रतिपादन डॉ. सुधीर रसाळ यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,विभागीय केंद्र औरंगाबाद,पॉप्युलर प्रकाशन आणि महात्मा गांधी मिशनतर्फे रविवारी (दि. ४) रुक्मिणी सभागृहात दासू वेद्य लिखित मेळाया ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन डॉ. रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय केंद्राचे अध्यक्ष तथा एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कवी सौमित्र,अस्मिता मोहिते,मुस्तजीब खान,शिव कदम,अभिजित झुंजारराव यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
डॉ. रसाळ म्हणाले,दासू हे कृषी संस्कृतीतून घडलेले व्यक्तिमत्व असून,त्यांनी मेळाच्या माध्यमातून आधुनिक जगाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या भावनिक पातळ्यांवर लेखन नेणे हे दासूंचे वैशिष्ट्ये असून,पुस्तकांत त्यांनी विलक्षण सांस्कृतिक प्रतिमा वापरून तटस्थपणे लेखन केले आहे.

काव्यवेगातील दृकश्राव्य माध्यमांच्या आधारे उलगडले बाउल : सौमित्र

वळू नकोस माघारी, दम खाऊ नकोस,
मरगळू नकोस, चालत राहा निर्हेतुक

67793352 1173017446239899 784944782748155904 n

सभागृह तुडुंब भरलेले... सर्वत्र अंधार.. काही वेळात अंधाराला भेदत प्रकाशकिरणे भेट बाउलवर पडली... आणि मग उजळला अभिनय आणि दृकश्राव्य माध्यमातून कवितेचा पाऊणतासाचा प्रवास. दर्‍याखोर्‍यातील रस्ते, धडधडत्या मायानगरीची रक्तवाहिनी असलेल्या रेल्वेची वास्तवता, गावातल्या शेवटच्या माणसाचं नातं, कुटुंबातील मोबाईल क्रांती, नात्यातील दुरावा... हे सर्व सादर करण्याची किमया साधली प्रसिद्ध अभिनेता तथा बाउलचे लेखक सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांनी. निमित्त होते प्रकाशन सोहळ्याचे.
बाउल काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर सौमित्र यांनी दृकश्राव्य स्वरूपात काव्यसंग्रहातील कवितांचे सादरीकरण केले. प्रत्येक कवितेच्या समारोपाला संगीताचा आधार होता. कविता सादर करताना रसिकांना प्रत्यक्ष कवितेच्या विश्वात घेऊन जाणारे चित्र दाखवून खिळवून ठेवण्यात आले. कवीच्या विचारचक्राचा आणि आयुष्याचा प्रवास कसा सुरू होत,या प्रवासात,एकांतात,लोकांतातही त्यांच्या भावविश्वाला जे भिडते,भेडसावते,त्या प्रसंगांचे चित्रण शब्दबद्ध करण्यात आले. आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या प्रवासात वळू नकोस माघारी,दम खाऊ नकोस,मरगळू नको,चालत राहा निर्हेतुकअसा संदेश सौमित्र यांनी काव्यरसिकांना दिला.
गावातला शेवटचा माणूस
झोपलेला असताना निघावं,

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft