महाविद्यालयीन नियतकालिक हे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम : आसाराम लोमटे

WhatsApp Image 2019 07 11 at 1.46.28 PM

विद्यार्थी दशेत तुम्ही जे लिहाल जर त्यात सत्व असेल तर ते सगळे स्वीकारतील, आपण त्यासाठी आपले निरीक्षण व अनुभव समृद्ध करायला हवे. महाविद्यालयीन नियतकालिक त्या लिखाणाची सुरुवात करण्याची योग्य संधी आहे. त्यातून आपण अभिव्यक्त व्हावे, असे आवाहन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०१८ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मानवत जि. परभणी येथील के.के.एम महाविद्यालयास यंदाचा उत्तेजनार्थ पुरस्कार या स्पर्धेत मिळाला आहे, त्याच्या वितरण प्रसंगी लोमटे बोलत होते.
मा. आसाराम लोमटे यांच्या हस्ते महाविद्यालयास पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रूवार, सचिव बालकिशन चांडक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, परभणी केंद्राचे सचिव विजय कान्हेकर, नांदेड केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे, अंकाच्या संपादक डॉ.शारदा राऊत, डॉ.दुर्गेश रवंडे, प्रा.अनंत मोगल याप्रसंगी उपस्थित होते.
नवमहाराष्ट्र्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत यांनी याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्थसंकल्प २०१९ : उद्योजकांसाठी

WhatsApp Image 2019 07 10 at 4.57.12 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर, मराठवाडा उद्योग आणि कृषी चेंबर, महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे अर्थसंकल्प २०१९ : उद्योजकांसाठी या विषयावर सोमवार दिनांक १५ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता आईन्स्टाईन हॉल, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम कॅम्पस, औरंगाबाद येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर चे अध्यक्ष संतोष मंडलेचा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft