स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान...

WhatsApp Image 2020 03 11 at 1.13.37 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
उद्योजक व मसीआ माजी अध्यक्ष सुनील किर्दक व्यापार-उद्योगाला करोनाचा फायदा की तोटा? या विषयावर गुरुवार, १२ मार्च २०२०, दुपारी १२ वाजता आचार्य विनोबा भावे सभागृह, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे व्याख्यान देणार आहेत.

७ व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे
५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजन...

महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश,
जगभरातील ४० फिल्म्सचे होणार प्रदर्शन

WhatsApp Image 2020 01 31 at 3.26.26 PM

औरंगाबाद : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. ५ ते रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. पैठण मेगा फुड पार्क प्रा. लि., सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. एमजीएम फिल्म आर्ट डिपार्टमेंट या महोत्सवाचे अ‍ॅकॅडमीक पार्टनर आहेत. एस.प्रेस.ओ हे बेव्हरेज पार्टनर तर ओआरबीसी हे थीम पार्टनर आहेत.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft