कचरा व्यवस्थापनाची माहितीपर पुस्तिका शाळांना भेट

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद निर्मित व परीक्षित सुर्यवंशी व त्रिशूल कुलकर्णी लिखित वेस्ट पासून बेस्ट ही कचरा व्यवस्थापनाची माहितीपर पुस्तिका आज औरंगाबाद जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ७०० शाळांमध्ये वितरित करण्यात आली.

शनिवार, दि. 23 जूनला चित्रपट चावडीत फ्रेंच भाषेतील ब्लू चित्रपटाचे प्रदर्शन

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय आयोजित चित्रपट चावडी या उपक्रमांतर्गत 1993 मधील फ्रेंच भाषेतील ‘ब्लू’ हा चित्रपट शनिवार, दि. 23 जून 2018 रोजी, सायं. 6 वा., आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.

आपण सगळेच सुजाण प्रेक्षक असतो, अनेक प्रकारचे नाट्यप्रवेश वा चित्रपट आपण सतत बघत असतो आणि त्यांच्यावर विचार देखील करत असतो पण आजकाल काही ठराविक पद्धतींचे चित्रपट आपल्या पर्यंत येत असल्यामुळे खर्या दर्जेदार कलाकृती आपल्या पर्यंत पोहचतंच नाहीत.

अशीच एक जगभर गाजलेली कलाकृती म्हणजेच Three Colours Trilogy. फ्रेंच भाषेतील ही 3 चित्रपटांची मालिका म्हणजे मानवी जीवन उलगडण्याचाच एक यशस्वी प्रयत्न होय. krzysztof kieslowski हा पोलिश दिग्दर्शक फ्रान्स च्या ध्वजावरील 3 रंगांनुसार तयार केलेल्या Blue, White आणि Red या चित्रपटांमधून अनुक्रमे स्वातंत्र्य, समता व बंधुता या नैतिक मूल्यांवरचे तत्वज्ञानच मांडतो. जीवनाचे अनेक अंग, त्याची प्रखरता आणि त्याच्याशी दिलेला लढा यांचे समग्र दर्शन होते ते krzysztof यांच्या खास दिगदर्शन शैलीतून आणि अत्यंत वास्तववादी अश्या कथांमधून...

मालिकेतिल पहिल्या चित्रपटा मधून kieslowski हे रोड वरील एका दुर्दैवी अपघातामध्ये आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या एका स्त्रीची गोष्ट सांगतो. जुली नावाची ही स्त्री एका संगीतकाराची पत्नी असते. अपघाता मध्ये मुलगा व पती यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे तिच्या आयुष्याच्या अर्थच नष्ट खरंतर नष्ट झालेला असतो म्हणून खचून जाऊन केलेली तिची आत्महत्या सुद्धा फोल ठरते. मग अनिच्छेने का होईना पण परिस्थितीशी जुळवून घेत जगण्यासाठीची धडपड आणि पूर्वायुष्यातील अनेक प्रसंगांशी सतत होणार्या संघर्षाला तोंड देत तिनी घेतलेला स्वातंत्र्याचा शोध म्हणजेच Blue...

चित्रपट रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, सल्लागार समिती सदस्य नंदकिशोर कागलीवाल, मुकुंद भोगले, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव, शिव कदम आदींनी केले आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft