सौमित्र लिखित बाउलकाव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन...

वास्तवाच्या शोधासाठी भटकावेच लागते:इंद्रजित भालेराव

68304525 1172942816247362 3314488328895594496 n
वास्तवाचा शोध घेण्यासाठी भटकावेच लागते. त्याशिवाय जग कळत नाही. प्रत्येक कवी हा बाउल असतो. जो बाउल नसतो तो कवी होऊच शकत नाही. यानुसार आतापर्यंतच्या कोणत्याही महान कवीचे अंतरंग उलगडून पाहिल्यास त्याच्यातील भटकेपणा, बाउलपणा दिसून येईल, असे प्रतिपादन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद,पॉप्युलर प्रकाशन आणि एमजीएम संस्थेतर्फे प्रख्यात कवी तथा अभिनेते सौमीत्र उर्फ किशोर कदम लिखित बाउलया काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी (दि. ३ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजता रंगला. अध्यक्षस्थानी विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते. व्यासपीठावर कवी दासू वैद्य,सहकारी संस्था सहनिबंधक संजय राऊत,पॉप्युलर प्रकाशनच्या संपादक अस्मिता मोहिते,डॉ. श्रीरंग देशपांडे,सुहास तेंडुलकर,डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. भालेराव यांनी बाउलकाव्यसंग्रहावर भाष्ये केले. रवींद्रनाथ टागोरांपासून आताच्या सौमित्रपर्यंत प्रत्येक कवी हा बाउल आहे. प्रत्येकाने भटकंती करीतच वास्तव जीवनाचे चित्रण आपल्या कवितेत चितारले आहे. आपले संतही बाउलच होते,बाउलांचा देश आहे. सगळे साधू बाउलच होते. कवीही साधूच असतो. जो कवी साधू नसतो,तो संधीसाधू असतो,असेही भालेराव यांनी सांगितले.

'मेळा' दासू वैद्य ललितलेखसंग्रह प्रकाशन सोहळा

67260340 1166459203562390 1498829438958174208 o

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, पॉप्युलर प्रकाशन व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०१९, सायंकाळी ६.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हनहिल्स, औरंगाबाद येथे 'मेळा' दासू वैद्य यांच्या ललितलेखांच्या संग्रहांचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. दासू वैद्य, कवी सौमित्र आणि पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा सर्वांसाठी खुला असून सर्वानी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft