बालाजी सुतार यांच्या कथेवर, कवितांवर आधारीत ‘गावकथा’
नाट्य-सादरीकरणाचा ९ सप्टेंबरला प्रयोग....यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत, गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे ‘गावकथा’ हा बालाजी सुतार यांच्या कथांचे, ललित गद्याचे अंश आणि कविता यांच्यावर आधारित संहितेच्या नाट्य-सादरीकरण प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.हा नाट्यप्रयोग सध्या राज्यभर गाजत असून मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत या कार्यक्रमाचे प्रयोग झालेले आहेत.ग्रामीण महाराष्ट्रातील गाव-खेड्यांचा भोवताल, मागच्या दोन-तीन दशकांत अतिशय झपाट्याने बदलून गेला आहे.

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मूल्यभानाचा र्‍हासही खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतीची बिकट अवस्था, स्त्रियांचं अवघड आयुष्य, दिशाहीन तरूणाई आणि मूल्यविहीन ग्रामीण राजकारण अशा अनेक अंगांनी गावाचा वेध घेणारी ही रंगमंचीय मांडणी आहे. ‘रंगदृष्टी, पुणे’या संस्थेने या प्रयोगाची निर्मिती केली असून संजय मोरे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. प्रयोगाला मयुर मुळे, दीप डबरे यांचे संगीत असून, संगीत साथ शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांनी केली आहे. यामध्ये संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, हर्षा ए.जी., अरबाज मुलानी आदी एकूण १६ कलाकारांचा चमू असून प्रयोगाचा वेळ साधारणपणे ऐंशी मिनिटांचा आहे. प्रवेश सर्वासाठी खुला असून नाट्यरसिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, काव्यरसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, डॉ. श्रीरंग देशपांडे, स. भु. कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, बिजली देशमुख, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. मुस्तजीब खान, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, एमजीएम फिल्म आर्ट विभाग प्रमुख शिव कदम, सुबोध जाधव,गणेश घुले,मंगेश निरंतर,श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार,श्रीराम पोतदार आदींनी केले आहे

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft