औरंगाबादमध्ये 'देवळी' छायाचित्र प्रदर्शन....यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने संदेश भंडारे यांच्या 'देवळी' छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ११ ऑगस्ट ते रविवार १९ ऑगस्ट दरम्यान देवळी छायाचित्र प्रदर्शन औरंगाबाद वासियांना एमजीएम कलादिर्घा आर्ट गॅलरी, एमजीएम स्टेडियम परिसर, गेट क्र. ७ औरंगाबाद (क्लोवरडेल शाळेच्या बाजूकडील गेट) येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत पाहता येईल.

संदेश भंडारे यांच्याबाबत थोडक्यात माहिती...एक विषय निवडून, त्याचे उभे-आडवे असंख्य छेद घेत, अनेकविध कोनांमधून, छायाचित्रांमधून मांडणारा, बोलणारा, भाष्य करणारे सुप्रसिध्द छायाचित्रकार !

संदेश यांच्या एक ब्राह्मण, तमाशा, बहुरूपी, कुस्ती, वारी, देवळी-कोनाडा या विषयांवरील छायाचित्रांची लंडन, पॅरिस, मुंबई, विद्यापीठ, पुणे, कोची व कोल्हापूर येथे प्रदर्शने झालेली आहेत. या व्यतिरिक्त असा एक महाराष्ट्र, मुंबई विद्यापीठ, पुणे शहर, कोल्हापूर शहर ही त्यांची छायाचित्रांचे पुस्तकेही प्रसिध्द आहेत.

संदेश यांचा कॅमेरा वास्तवाच्या पार जाऊन वस्तू, आकार, अवकाश, चेहरे आणि आकृत्यांचे नवे अर्थ उलगडून दाखवतो.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft