कुमार गंधर्व समजून घेण्याचा अवीट प्रवासऔरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व स.भु.कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुमार गंधर्व यांच्या बंदिशीवर,गायकीवर,सांगितिक प्रवासावर आधारित "बहुरी अकेला" हा दृक-श्राव्य कार्यक्रमाने रसिकासमोर कुमार गंधर्व यांचा सांगीतिक जीवनपट उभा केला.

सायली ताम्हणे आणि धनंजय मुळी यांनी उत्तम सादरीकरण करून कार्यक्रम एका उंचीवर नेला.कुमार गंधर्व यांचे गायना विषयीचे विचार,त्यांनी गायलेल्या तुकाराम,कबीर,तुलसीदास,सूरदास यांच्या भजनापासून तर लोकधुन मधून केलेली रागाची निर्मिती पर्यंतचा प्रवास ऐकताना रसिक अक्षरसः मंत्रमुग्ध झाले.

कुमार गंधर्वांवर सादर केलेल्या ‘बहुरी अकेला’ हा कार्यक्रम हा लौकिकार्थाने गाण्याचा कार्यक्रम नाही म्हणजे ‘कुमारांची’ गाणी सादर करणे असा तो कार्यक्रम नव्हता तर कुमारांनी गायकी क्षेत्रात डोळसपणे केलेले वेगवेगळे प्रयोग, धुंढाळलेल्या नवीन नवीन वाटा, त्यांनी फक्त लोकप्रिय गाणी वारंवार सादर करणे टाळून सातत्याने प्रयोगशीलता जपली, मग त्यातून कबिरांचे निर्गुणी भजन किंवा बालगंधर्वांची गायकी असेल किंवा मिराबाईची भजने, तुकारामांच्या रचना, माळव्यात गायली जाणारी लोकगीत यासोबत अनेक प्रयोगातून वेगळेपणा जपला, पडलेल्या प्रश्नाची उत्तरे डोळसपणे शोधली वसंत बापटांनि घेतलेली मुलाखत या कार्यक्रमात आहे, त्यात संगीत ईश्वराची अनुभूती देते का या प्रश्नावर कुमारांनि खूप सुंदर उत्तर दिलंय, " मी गाण्याची अनुभूती घेतो, बाकी देव असेल तर तो नक्की येईलच की " कुमार गंधर्व लौकिकार्थाने बंडखोर होते असे म्हणता येणार नाही पण अतिशय डोळसपणे प्रयोगशील गायक होते, व्यवसायाने अभियंता असलेले सायली तामने, सनत गानू आणि धनंजय मुळी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती.

गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांनी केले.यावेळी सभु संस्थेचे सहसचिव श्रीरंग देशपांडे,साहित्यिक रा.रं.बोराडे,प्राचार्य डॉ. जगदिश खैरनार,संगीत विभाग प्रमुख डॉ. संजय मोहोड यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीश व कस्तूरी जोशी तर आभार श्रीकांत देशपांडे यांनी मानले.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft