कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजनअहमदनगर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अहमदनगर, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई, मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई, यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. यशवंतराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. प्रशांतभाऊ गडाख पाटील यांच्या कल्पक नियोजनाखाली शनिवार दि. १ जुलै २०१७ रोजी सकाळी ९ वाजता कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुकूंदराव गायकवाड कुलपती, अरविंद कृषी विद्यापीठ, नागपूर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर पवार कृषीभूषण, पुनतगाव. ता. नेवासा हे असतील. डॉ. विनायक देशमुख सहसचिव, मुळा एज्युकेशन सोसायटी, उत्तमराव लोंढे सचिव, मुळा एज्युकेशन सोसायटी श्री. शंकरराव पटारे जनरल मॅनेजर, मुं. स.सा. कारखाना सोनई यांची प्रमुख उपस्थिती असेल. हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय सोनई येथे होईल.

"शेती कट्टा" एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर, आयोजित मा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतुन साकारलेला"शेती कट्टा" हा कार्यक्रम नूकताच नवनाथ बाबा मंदिर, भायगाव ता. शेवगाव, जि. अहमदनगर पार पडला. कार्यक्रमामध्ये प्रमुख विषय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (ऊस व कापुस) ठेवण्यात आला होता. तज्ज्ञ मार्गदर्शक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन.प्रा. डॉ. अनिल दुर्गुडे, मृदा व कृषि रसायन शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन केले.

   

विभागीय केंद्र - अहमदनगर

मा. श्री. यशवंतराव गडाख
अध्यक्ष विभागीय केंद्र, अहमदनगर
श्री. प्रशांत गडाख, सचिव

विरंगुळा, यशवंत कॉलनी,
जिल्हा - अहमदनगर
कार्यालय : ०२४१-२३२३३३३
ईमेल : mulasug.anr@sancharnet.in

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft