यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभाग

१. सृजन

यशवंत चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर ‘सृजन’ विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व  विकास आणि विविध कलांची तोंड ओळख करुन त्यांचे विद्यार्थी जीवन समृद्ध व्हावे याकरिता सृजनचा हा अभिनव उपक्रम चालविण्यात येतो. सर्जनशीलतेचा अविष्कार विदयार्थ्यांसोबत घडवून त्यांच्यामधील सुप्तकलागुणांना वाव देययाचा हा प्रयत्न आहे. सृजनच्या कार्यशाळेत प्रत्येक सत्रात १०० ते १५० च्या आसपास विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. सृजनची संकल्पना व संयोजक सौ. सुप्रियाताई सुळे यांची असून यामध्ये सुप्रसिध्द चित्रकार श्री. डग्लस जॉन आणि सुलेखनकार श्री. शुभानंद जोग सन्माननीय. सल्लागार म्हणून काम पाहतात. श्री. विदयाधर खंडे या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम करीत आहेत.

२. वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे 'वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियान' हे पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणासाठी उभारलेले व्यासपीठ आहे. खासदार सौ. सुप्रिया सुळे अभियानाच्या निमंत्रक आहेत. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीची समस्या आज संपूर्ण जगाला भेडसावत आहे. त्यांच्या दुष्परिणामांना मुंबईलाही सामोरे जावे लागणार आहे म्हणून हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीची समस्या नीट समजून घेण्यासाठी आणि त्यांचा एकूणच पर्यावरण व मानवी जीवनावर होणारा परिणाम याबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने हवामान बदल विषयक शिक्षण व कृती प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांबरोबर स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय उपाययोजना करण्याकरिता विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांची तयारी करून घेणे, स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींचे संवर्धन करणे, वीज पाण्याच्या अपव्ययाचे ऑडीट करणे, देशी बियाण्यांची बॅंक स्थापन करणे, टाकाऊ कागदापासून नवा कागद निर्माण करणे, स्थानिक बाग, जंगल, सागरकिनारा अशा नैसर्गिक स्थळांच्या क्षेत्रभेटी आयोजित करणे, यासारखे विविध कृतीशील उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft