यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार सोहळा
यंदाचा पुरस्कार पद्मविभूषण डॉ. शास्त्रज्ञ मनमोहन शर्मा यांना...


राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०५ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तर या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१७’ हा पद्मविभूषण डॉ. मनमोहन शर्मा यांना प्रदान करण्यात येणार आहे.

२०१७ सालाकरिता सतीश सिडाम व कृपाली बिडये सामाजिक पुरस्कार तर मोहम्मद नुबैरशहा शेख, किशोरी शिंदे क्रीडा पुरस्कार, आकाश चिकटे विशेष क्रीडा पुरस्कार मानकरी, दि. १५ जानेवारी २०१८ रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे पुरस्कारांचे वितरण

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१७’ ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणा-या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो तसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. पुरस्काराचे यंदाचे एकोणिसावे वर्ष आहे. सदरील पुरस्कारांचे वितरण सोमवार दि. १५ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वा. कल्चरल सेंटर, सिंह्गड इन्स्टिट्यूट कॅम्पस, सिंह्गड रोड, वडगाव, पुणे येथे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष श्री. अजित निंबाळकर व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft