मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात 'उमेद'च्या कार्यक्रमाला सुरूवात



महाराष्ट्रात २०१६-१७ वर्षात शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचा आकडा हा वाढतच चालला आहे. शासकीय यंत्रणेमार्फत तसेच इतर स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी प्रयत्न होतात. परंतु आत्महत्या झालेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांचे पुढे भवितव्य काय? हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा बनत चालला आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना केवळ आर्थिक मदत देऊन उपयोग नाही तर त्यांचे संपूर्ण पुनर्वसन व्हायला हवे या भूमिकेतून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 'उमेद' या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला सहायता उपक्रमाची सुरुवात आज लातूर येथे केली. यशस्विनी सामाजिक अभियान व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई च्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

समुपदेशन, प्रशिक्षण व प्रत्यक्ष मदत या त्रिसुत्रीच्या आधारे सुरु असलेल्या या उपक्रमामध्ये मराठवाड्यातील सोळा ते चाळीस वयोगटातील दोनशे विधवा महिलांची निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पंचवीस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विधवा महिला या उपक्रमात असणार आहेत. या महिलांना आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण व त्यांचे आरोग्य या माध्यमातून सहाय्य करण्यात येणार आहे.

दि.२२ ते २५ मे २०१७ या काळात लातुर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व औरंगाबाद या सहा जिल्ह्यांमध्ये उमेद या कार्यक्रमांतर्गत पिठाची गिरणी, दोन शेळ्या, पिको फॉल मशिन, शिलाई मशीन, शेवयाची मशीन यापैकी एक व्यवसाय साधन व हेल्थ कार्ड वाटप करण्यात येणार आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft