यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून..

बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० जानेवारीपासून सुरु होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रतिष्ठानच्या चव्हाण सेंटर मध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे.

महोत्सवाचे यंदा ७ वे वर्ष आहे. महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणा-यास गौरविण्यात येते. आतापर्यंत अनुपम खेर, वहिदा रेहमान सारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे. यंदा चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी yiffonline.com या संकेतस्थळाला भेट द्या...

भारतीय चित्रसृष्टीतील योगदानाबद्दल
शरद पवार यांच्या हस्ते अभिनेता पंकज कपूर यांचा गौरव.
.

बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० जानेवारीपासून सुरु होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. २० जानेवारी रोजी प्रतिष्ठानच्या चव्हाण सेंटर मध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे.
महोत्सवाचे यंदा ७ वे वर्ष आहे. महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्यास गौरविण्यात येते. आतापर्यंत अनुपम खेर, वहिदा रेहमान सारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे. यंदा चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे.

व्यवसायाने अभियंता (इंजिनीयर) असणारे पंकज कपूर मनाने मात्र अभिनेते आहेत. प्रत्येक पात्राचा सखोल अभ्यास करून त्या पात्राला न्याय मिळून देतात. त्यांनी अनेक चित्रपटातून, मालिकांमधून, नाटकांमधून रसिकांच्या मनावर राज्य केले. ‘करमचंद’, ‘जबान सभांल के’ यांसारख्या दूरचित्रवाणीवरील मालिकेमधून सार्वजनिक कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यांनी आपल्यासमोर आणला . ‘राख’ , ‘एक डॉक्टर की मौत’(१९९१), ‘मकबूल’ या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
अशा चतुरस्त्र अभिनेत्याला सन्मानीत करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख ही उपस्थित राहणार आहेत.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft