एखादी फिल्म तुम्हाला का आवडते?

बकवास फिल्म आहे.. सुपर्ब स्टोरी आहे... ह्यापेक्षा सविस्तर तुम्ही काय लिहू शकता?

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित चित्रपट समीक्षा स्पर्धा. तुम्हाला आवडलेल्या अथवा न आवडलेल्या कुठल्याही चित्रपटाची ३०० शब्दात समीक्षा लिहून आम्हाला पाठवा.
पहिल्या तीन उत्कृष्ट समीक्षेला रोख पारितोषिक. आणि महोत्सवानिमित्त निघणाऱ्या न्यूज लेटरचे संपादन करण्याची संधी. ५ उत्तेजनार्थ बक्षिसं. त्यांना Festival Event Management मध्ये भाग घेण्याची संधी.
तुमची समीक्षा ह्या मेल वर पाठवा
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
अधिक माहितीसाठी : yiffonline.com

  ‘यशवंत’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व पुणे फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने दरवर्षी चव्हाण सेंटर, मुंबई येथे ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आयोजित केला जातो. या चित्रपट महोत्सवात विविध देशातील सुमारे ७५ निवडक चित्रपट दाखविले जातात. या चित्रपट महोत्सवात केंद्रातील मुख्य सभागृह, रंगस्वर सभागृह व सांस्कृतिक सभागृहात डीसीपी, ब्लू रे, डीव्हीडी व डीजीबीटा याद्वारे दिवसाला प्रत्येकी ५ चित्रपट दाखविले जातात. चित्रपट महोत्सवात ग्लोबल सिनेमा ४०, रिट्रॉस्पेक्टिव्ह ५, कंट्री फोकस ७, इंडियन सिनेमा ५, स्टुडंट कॉम्पिटीशन १० दाखविल्या जातात.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft