'स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमाले'मध्ये
आशुतोष गोवारीकर यांचा दिलखुलास संवाद...यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० जानेवारीपासून विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थित सुरू आहे. हा महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, प्रत्येक दिवशी वेगवेगळे चित्रपट आणि मान्यवरांचं मार्गदर्शनपर कार्यक्रम महोत्सवात होत आहेत. आज `स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस’ प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी उपस्थितांना ‘’मी सिनेमाकडे कसा पाहतो’’ ह्या विषयावर मार्गदर्शन केले. व्याख्यानाला रसिक प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

व्याख्यानाच्या सुरूवातीला डॉ. जब्बार पटेल यांनी गोवारीकर यांच्या चित्रपट बाबतच्या विविध पैलू सांगितले. तसेच त्यांच्या नावाजलेल्या चित्रपटांमधील काही गोष्टी प्रेक्षकांच्या समोर उलघडून सांगितले. आशुतोष गोवारीकर यांनी स्मिता पाटील यांची पडद्यावरील भूमिका याबाबत प्रेक्षकांना माहिती दिली. त्यानंतर त्यांचे नावाजलेले आणि पुरस्कार प्राप्त सिनेमांमधील भूमिकांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
गोवारीकरांचा आत्तापर्यतच्या सिनेमा प्रवास तसेच त्यांनी केलेले चित्रपट या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या आयुष्यातील चांगले वाईट प्रसंगाचे सुध्दा प्रेक्षकांसमोर कथन केले. प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मनसोक्त व दिलखुलास संवाद साधला.

चिली संगीत दिग्दर्शक जॉर्ज ऍरिगडाचे सिनेरसिकांना मार्गदर्शन...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७' , यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सध्या सुरू असून, आज चिली देशातील संगीत दिग्दर्शक जॉर्ज ऍरिगडा यांचा मास्टर क्लास ‘म्युझिक ऍन्ड साऊंड इन सिनेमा’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे कार्यक्रमामध्ये त्यांनी संगीतातील काही मोजके घटक सिनेरसिकांना समजावून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. चित्रपटांमध्ये पडद्यामागील संगीत कसे असायला हवे? हे सुरुवातीला स्पष्ट केले. संगीत क्षेत्रामधील त्यांनी चित्रफिती दाखवून त्यावर मार्गदर्शन तसेच उपस्थितांच्या शंका-समाधान केले. आपल्या शंकाना योग्य उत्तर दिल्याने संगीत रसिक सुखावून गेले

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft